आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापार्थिक देसाई/जयदीपसिंह परमार
बार्डोली (गुजरात) - पूर्णत: दारूबंदी असलेल्या गुजरातेत झाेमॅटो-स्विगीचे काही डिलिव्हरी बॉय बिनधास्तपणे दारूचे ‘पार्सल’ आणूत देत आहेत. हे डिलिव्हरी बॉय घरच नव्हे रुग्णालये, पोलिस ठाण्यापर्यंत तळीरामांची ‘ऑर्डर’ पूर्ण करत आहेत. कुणाला संशय येऊ नये म्हणून ते ‘ही घ्या तुमची व्हेज बिर्याणी’सारखे कोडवर्ड वापरून दारूची डिलिव्हरी करतात. दारूची बाटली आणून देण्यात भीती वाटत नाही का, या प्रश्नावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आपली बॅग दाखवत म्हणाला, ही किट आहे ना! आपल्या कंपनीच्या परस्परच हे बॉय हा अवैध धंदा करत असल्याचा संशय आहे.
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयचा पर्दाफाश करण्यासाठी दैनिक भास्करने गुजरातेतील काही शहरांत ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान महिनाभर स्टिंग ऑपरेशन केले. यासाठी घर, पोलिस ठाणे, रुग्णालयांसारख्या सार्वजनिक स्थळीही दारूची ऑर्डर दिली. ती या डिलिव्हरी बॉयने पूर्ण केली.
झोमॅटो-स्वीगीच्या गणवेशामुळे पोलिसांना संशय येत नाही
या स्टिंगनुसार झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पहिली ऑर्डर दिली. घरी दारुची बाटली पोहोचवली. या वेळी एका डिलिव्हरी बॉयने दावा केला की, सुरत असो की बार्डोली, हॉस्पिटल असो वा कॉलेज, जेथे हवे तेथे दारुची डिलीव्हरी देऊ. झोमॅटो आणि स्वीगीचे गणवेश असल्याने पोलिसांना या मुलांवर संशय येत नाही. म्हणूनच या मुलांनी चक्क दारु पोहोचवण्याचे काम करत अवांतर कमाईचा हा एक स्रोत तयार केला आहे. यात डिलिव्हरी कंपनीचा थेट सहभाग नसतो.
फूड डिलिव्हरी कंपनीच्या बॅगमध्ये ठेवून तस्करी
> भास्कर: हॅलो, झोमॅटो?
झोमॅटो : कोण बोलतंय...?
> भास्कर: काल बाटल्यांचे बोललो होतो.
झोमॅटो : कोणत्या बाटलीविषयी?
> भास्कर: दारूच्या....
झोमॅटो : नंतर बोलतो...
दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला.
> झोमॅटो : आज व्यवस्था करतो.
> यानंतर डिलिव्हरी बॉयने रात्री फ्लॅटमध्ये व्हिस्कीच्या बाटलीची डिलिव्हरी दिली. प्रतिनिधीने विचारले, पुन्हा लागली तर मिळेल? ... तो म्हणाला, कुठेही डिलिव्हरी देईन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.