आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat: Asaram And His Son Narayanasai Got Clean Chit For Death Of Two Children In Ashram

गुजरात : आश्रमात दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी आसाराम व मुलगा नारायणसाईला क्लीन चिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर  - मुलींच्या लैंगिक शोषणासह अनेक प्रकरणांतील आरोपी आसाराम व त्याचा मुलगा नारायणसाई यास चौकशी आयोगाने क्लीन चिट दिली आहे. न्या. डी. के. त्रिवेदींच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाचा अहवाल शुक्रवारी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. अहवालात मुलांचा मृत्यू बुडून झाल्याचे मान्य करण्यात आले. त्यांचा मृत्यू काही मांत्रिक विधीने झाला यास ठोस पुरावा उपलब्ध नाही. मुलांचे सर्व अवयव सुस्थितीत होते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. अहवालात म्हटले आहे की, आसाराम व त्याचा मुलगा नारायणसाईद्वारे गुरुकुलमध्ये काही मंत्रविद्या केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. अहमदाबादमधील मोटेरा येथील आसारामच्या आश्रमात  ५ जुलै २००८ रोजी गुरुकुलातील दीपेश व अभिषेक नावाच्या दोन मुलांचे कुजलेले मृतदेह सापडले होते. त्यांच्यावर मांत्रिक विधी करून नरबळी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन केला होता. आयोगाने २०१३ मध्येच अहवाल दिला होता. सहा वर्षांनंतर हा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला.