Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Gujarat bus stuck in pothole on 'Rangavi' river bridge

'रंगावली' नदीच्या पुलावरील खड्ड्यात अडकली गुजरात बस; २० प्रवासी सुखरूप

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 11:45 AM IST

येथील नेहरू उद्यानाजवळील रंगावली नदीवरील काॅजवे पुलावर बुधवारी पहाटे ४ वाजता गुजरात परिवहन महामंडळाची अहमदाबाद- भुसावळ

 • Gujarat bus stuck in pothole on 'Rangavi' river bridge

  नवापूर- येथील नेहरू उद्यानाजवळील रंगावली नदीवरील काॅजवे पुलावर बुधवारी पहाटे ४ वाजता गुजरात परिवहन महामंडळाची अहमदाबाद- भुसावळ बस (क्र.जी.जे.१८, झेड २३०३) खड्ड्यात अडकली. पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला. या वेळी बसमध्ये एकूण २० प्रवासी होते.

  १७ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रंगावली नदीला महापूर अाला हाेता. त्याला १९ दिवस होऊनही पाणी कमी झालेले नाही. या काॅजवे पुलावर पाण्यामुळे मोठा खड्डा पडला अाहे. या खड्ड्यात बसचे चाक अडकल्यामुळे बस पुलाच्या मध्यभागी फसली होती. जेसीबी मशीनद्वारे बसला पाण्यातून काढण्यात अाले. बसचालक धीरूभाई शर्मा व वाहक आशिष पटेल यांना नवापूर पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात हजर केले होते.


  बंद पुलामुळे विद्यार्थी, नागरिकांना हाेताेय त्रास
  १७ अाॅगस्टला झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वेस्थानक, उच्छल, खाकरफळी इ.भागास जोडणाऱ्या शासकीय विश्रामगृहाजवळील पुलावर बऱ्याच ठिकाणी डांबर उखडल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीस सद्य:स्थितीत बंद आहे. तसेच स्वस्तिक डाळमिलमागील कॉजवेवर पाणी असल्याने त्या पुलावरूनही वाहतूक व रहदारी बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना करंजी ओवाराच्या पुलावरून फेरा घालून शहरात यावे लागते. रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी जास्तीचे भाडे द्यावे लागते. कधीकधी रेल्वेही निघून जाते.


  पाचपैकी दोनच पुलांवरील वाहतूक सुरू
  शहरात रंगावली नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एकूण पाच पूल आहेत. त्यात एक रेल्वेचा तर उर्वरित चार पूल आहेत. त्यात महामार्गावरील जुना पूल आणि करंजी ओवरा येथील नव्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. नेहरू उद्यानाजवळील लहान पुलावर पाणी असल्याने आणि विश्रामगृहाजवळील पुलाचे बांधकाम ब्रिटिशकालीन असल्याने सुरक्षेच्या कारणाने वाहतूक बंद केली आहे.


  सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद
  नवापूर पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र व गुजरात राज्यातील परिवहन महामंडळाला पत्राद्वारे कळविले आहे. महापुरामुळे नेहरू उद्यानाजवळील पूल खराब हाेऊन धोकेदायक झाले आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाजवळील पुलाचे बांधकाम ११० वर्षांपूर्वीचे असल्याने सुरक्षेच्या कारणाने वाहतूक बंद केली आहे.

  - विजयसिंह राजपूत, पोलिस निरीक्षक, नवापूर

Trending