आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : भाजपसाठी क्लीन स्विप कठीण; 13 जागांवर कडवे अाव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - लालकृष्ण अडवाणी हे अधिक वयामुळे अापल्या मतदारसंघाचा नियमितपणे दाैरा करू शकत नसल्याचे मान्य केले तरी त्यांचे प्रतिनिधीदेखील कधीच मतदारसंघात फिरकत नसल्याचे चित्र असल्याचे गांधीनगरचे अरुण बूच यांचे म्हणणे अाहे. निवृत्त झालेले बूच हेदेखील सांगतात की, नजरेस भरेल असे एकही काम गांधीनगरमध्ये दिसून येत नाही. खासदारांप्रती असलेल्या नाराजीचे हे चित्र गुजरातच्या इतर भागांतही अाहे. अहमदाबादेतही हेच चित्र आहे.


पूर्व अहमदाबादचे शेअर बाजारतज्ज्ञ राेनक अांचल सांगतात की, निवडून अाल्यानंतर या मतदारसंघातील खासदाराला या भागात यावेसे वाटलेले नाही. परेश रावल तेथील खासदार आहेत. तथापि, भरूचसारखे असेही मतदारसंघ अाहेत, जेथे सध्या असलेल्या खासदाराशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे लाेकांचे म्हणणे अाहे. राजकाेटवासीयही त्यांच्या खासदाराच्या कामांवर खुश अाहेत. म्हणजेच, राज्यातील नागरिकांची मते संमिश्र अाहेत; परंतु गुजरातबद्दल राजकीय तज्ज्ञांचे मत स्पष्ट अाहे. त्यांच्या मते या वेळी भाजपसाठी क्लीन स्विप करणे कठीण जाईल. 
माेदी दिल्लीला गेल्यानंतर भाजपसाठी गुजरातमध्ये परिस्थिती बदलली असून गेल्या ३ वर्षांत काँग्रेस पुन्हा उभारी धरत असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. 


२०१५ च्या स्थानिक संस्था निवडणुकांत गुजरातच्या ३१ जिल्हा परिषदांपैकी २२ वर काँग्रेसने ताबा मिळवला हाेता. तसेच २०१७ मधील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने ६१ वरून पुढे जात ७७ जागा मिळवल्या. याउलट भाजपला २०१२ मध्ये मिळालेल्या ११५ जागाही सांभाळता अाल्या नाहीत. त्यांना केवळ ९९ जागा मिळाल्या. बहुमतापेक्षा त्या फक्त ७ जास्त आहेत.
या स्थितीमुळे अागामी लाेकसभा निवडणुकांतही काँग्रेस येथे ४ ते ८ जागा जिंकू शकते, असे तज्ज्ञांना वाटतेय. राजकीय तज्ज्ञ हरी देसाईंचे म्हणणे अाहे की, शेेतकरी, अादिवासींसह सामान्य नागरिकांची नाराजी, हे यामागील कारण ठरू शकते. तथापि, यावर अाताच काही म्हणणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


दुसरे एक तज्ज्ञ विष्णू पंड्या सांगतात की, काँग्रेसला लाेकसभेच्या ४-५ जागा मिळू शकतात; परंतु ही निवडणूक भाजपच्याच बाजूने राहील. निवडणुकीचे सूक्ष्म नियाेजन व माेदींचे गृहराज्य असल्याने भाजप गुजरातमधील सर्व २६ जागा पुन्हा जिंकेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघाणी यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनीही पक्ष लाेकसभेच्या १६ जागा जिंकेल, असा दावा केला अाहे. एकूणच निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित.  

 

राज्यात झालेल्या तीन माेठ्या अांदाेलनांचे काय झाले?  
- पाटीदार अांदाेलन : बहुतांश शेतकरी हाेते. त्यामुळे हे अांदाेलन शेतीशी निगडित अांदाेलनात रूपांतरित झाले अाहे.  
- अाेबीसी अांदाेलन : अारक्षणाचा याेग्य लाभ देण्याची मागणी व राेजगाराच्या मुद्द्यात अांदाेलनाचे रूपांतर.  
दलित अांदाेलन : दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा अजूनही कायम अाहे. कारण त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतच अाहेत.
अाता राज्यात माेठे मुद्दे काेणते?  

शेतकऱ्यांची नाराजी : राजकीय तज्ज्ञ विद्युत जाेशींनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या जमिनी, विम्याचा लाभ, हमीभाव हा अागामी निवडणुकीत माेठा मुद्दा बनू शकताे.  
- शैक्षणिक क्षेत्रात भरमसाट शुल्क व बेराेजगारी.  
- पेट्राेल-डिझेलचे दर व प्रवासींचा मुद्दा.  
- भाजपच्या बाजूने काय? : भाजप माेदींची प्रतिमा व गुजरातच्या शहरी भागात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरेल. 

 

२० वर्षांत बदलली परिस्थिती 
१९९८ ते २०१७ पर्यंत झालेल्या ५ निवडणुकांत काँग्रेस मजबूत झाली अाहे. २००२ मध्ये माेदी सत्तेत अाले तेव्हा काँग्रेसकडे विधानसभेच्या ५१ जागा हाेत्या. त्या २०१७ मध्ये वाढून ७७ झाल्या.    

भाजपसमाेरील अाव्हाने  अशी

१.  २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ७ जिल्ह्यांतील २१ जागांपैकी भाजपला एकही मिळाली नाही. इतर ८ जिल्ह्यांतील २६ विधानसभा जागांपैकीही केवळ ८ जागा मिळाल्या. या १५ जिल्ह्यांत लाेकसभेच्या १३ म्हणजे निम्म्या जागा अाहेत. म्हणजेच, या जागांवर लाेकसभा निवडणुकीत काँग्रेस माेठे अाव्हान निर्माण करू शकते.  
२.  पाटीदार, अाेबीसी, एससी-एसटी या अांदाेलनांवर राज्य सरकार नियंत्रण मिळवू शकले नाही. त्यामुळे धरणे, माेर्चे, निदर्शनांतून अावाज उठवला जाऊ शकताे, अशी नागरिकांची पक्की धारणा झाली अाहे. परिणामी, शेतकऱ्यांसह बेराेजगार तरुण, लहान-माेठे दुकानदार व उद्याेगपती अापापल्या मागण्यांसाठी पुढे येत अाहेत.  

बातम्या आणखी आहेत...