आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोदीप्रेमा'तून एकत्र आलेले 'ते' दाम्पत्य विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर..पतीने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा अल्पिकाचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी 'लव्ह अॅट फेसबुक कमेंट'च्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगणार्‍या गुजरातमधील जय दवे आणि अल्पिका पांडे हे दाम्पत्य आता विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोघांची लव्हस्टोरी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. मात्र, अल्पवधीत अल्पिता हिने पतीवर गंभीर आरोप केले आहे. पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे आरोप अल्पिताने केले आहेत.

 

जय आणि अल्पिता हे दोघे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करता जय आणि अल्पिताचे प्रेम जुळले होते. नंतर दोघे 31 डिसेंबर 2018 ला विवाहाच्या बंधनात अडकले होते. मात्र, या दाम्पत्याच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. जय हा गुजरातमधील जामनगरचा रहिवासी आहे.

 

 

मी बाथरुममध्ये काय करते हे देखील सांगावं लागतं- अल्पिका
विवाहाच्या अवघ्या एका महिन्यात अल्पिका पांडे हिने ट्विटरच्या माध्यमातून पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे. पती शिवीगाळ करतो. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ करतो, असा आरोप अल्पिताने केला आहे.

 

जय मला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी देत नाही. माझ्यावर कायम संशय घेतो. एवढेच नाही तर मी बाथरुममध्ये काय करते, हे देखील त्यांना सांगावे लागतले. माझा फोन हिसकावून घेतला जातो. जयचे माझ्यावर खरंच प्रेम होते की, त्याने केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी लग्न केले याबाबत आता मला शंका येत आहे.एखादा मोदी भक्त भक्तीच्या नावाखाली पत्नीशी असेच वागतो का ?, असा सवाल अल्पिताने उपस्थित केला आहे.

 

जय आणि अल्पिता असे आहे होते एकत्र..

'नरेंद्र मोदीजी आम्ही तुमच्यामुळे विवाहबंधनात अडकलो. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबुक पेजवर मोदींच्या समर्थनार्थ कॉमेंट केली आणि त्यांच्या मतदारसंघातील या सुंदर युवतीने ती कमेंट लाईक केली. आम्ही बोललो. भेटलो आणि आम्ही दोघेही तुम्हाला समर्थन देत असल्याचे लक्षात आले. आम्हाला देशासाठी जगायचे आहे आणि म्हणूनच आम्ही ते एकत्र करण्याचे ठरवले,' अशी पोस्ट जयने केली होती.

 

जयची पोस्ट अल्पावधीतच व्हायरल..

जयची वरील पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली होती. या दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

बातम्या आणखी आहेत...