गुजरात / मुलीने हुंड्यात तिच्या वजनाइतकी पुस्तके मागितली, वडिलांनी 6 महिन्यांत 2200 पुस्तकं गोळा केली

  • मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी दिल्ली, काशी आणि बंगळुरुसह इतर शहरातून पुस्तकं जमा केली
  • यामध्ये महर्षी वेद व्यास यांच्यापासून आधुनिक लेखकांच्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेतील पुस्तकांचा समावेश

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 01:03:44 PM IST

राजकोट - आपल्या मुलीला सासरी पाठवताना साधारणतः लोक आपल्या लेकीला दाग-दागिने, कपडे, वाहन किंवा नगदी पैसै देतात. मात्र गुजरातच्या राजकोट येथे एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या वजना एवढे 2200 पुस्तके देऊन तिची सासरी पाठवणी केली.


नानमना गावातील रहिवासी शिक्षक हरदेव सिंह जडेजा यांची मुलगी किन्नरी बा हिला लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता. तिच्याकडे 500 पुस्तकांचे ग्रंथालय आहे. वडोदराचे अभियंता पुरजितसिंग यांच्याशी जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा ती वडिलांना म्हणाली की, माझ्या लग्नात जर तुम्ही माझ्या वजनाइतकी पुस्तके हुंड्यामध्ये दिली तर मला आवडेल. तेव्हा वडील हरदेव सिंह यांनी आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले.


पुस्तके गोळा करण्यासाठी लागले सहा महिने


हरदेव सिंह यांनी मुलीच्या आवडत्या पुस्तकांची यादी तयार केली. यानंतर 6 महिने दिल्ली, काशी आणि बंगळुरुसह अनेक शहरांतून पुस्तके गोळा केली. यामध्ये महर्षी वेद व्यास यांच्यापासून आधुनिक लेखकांची इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. कुराण, बायबल सह 18 पौराणिक पुस्तकांचा समावेश आहे.

X