आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात सरकारने मुख्यमंत्र्यांसाठी विकत घेतले 191 कोटी रुपयांचे नवीन विमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - भाजपच्या नेतृत्वातील गुजरात सरकारने चक्क 191 कोटी रुपयांचे नवीन विमान विकत घेतले आहे. हे विमान केवळ गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि अती महत्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरले जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या नवीन विमान योजनेचे अखेर बुधवारी औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बम्बार्डिअर चॅलेंजर 650' नावाचे हे विमान येत्या दोन आठवड्यात गुजरात सरकारच्या स्वाधीन केले जाणार आहे.

अशी आहेत विमानाची वैशिष्ट्ये
 
गुजरात सरकारने विकत घेतलेल्या नवीन विमानात 12 जण प्रवास करू शकतात. एकाचवेळी उड्डाण भरल्यास सलग 7000 किमी पर्यंत हे विमान नेता येईल. गेल्या 20 वर्षांपासून गुजरात सरकारच्या मुख्यमंत्री आणि व्हीआयपींना 'बीचक्राफ्ट सुपर किंग' विमानात प्रवास घडवले जात होते. त्याचीच जागा नवीन विमान घेत आहे. जुन्या विमानाच्या तुलनेत 'बम्बार्डिअर चॅलेंजर 650' अधिक सक्षम आणि आधुनिक आहे. याची स्पीड ताशी 570 किमी राहील. हे विमान विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरी (करदात्यांवर) 191 कोटी रुपयांचा भार पडला आहे. विमान गुजरातमध्ये आणण्यासाठी सर्वच औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून याच महिन्यात डिलिव्हरी मिळेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...