आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Hospital Nurse Made Woman To Deliver Baby In Veranda While Holding Window

निष्काळजीपणाचा कळस! नर्सने बाळंतीणला गॅलरीत खिडकी धरून उभ्याने करायला लावली डिलिव्हरी, फरशीवर पडला नवजात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातून निष्काळजीपणा आणि अमानुष वृत्तीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. बनासकांठा जिल्ह्यातील जलोत्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गर्भवती महिलेला गॅलरीत उभे करून उभ्याने डिलिव्हरी करण्यास मजबूर केले. प्रसव वेदना होत असतानाही तिला रुममध्ये जागा दिली नाही. उलट, खिडकीच्या ग्रिलला घट्ट धरून तिला उभे राहण्यास सांगितले. अशाच अवस्थेत तिने बाळाला जन्म दिला तो देखील चक्क फरशीवर पडला. ही घटना शुक्रवारी घडली असून नुकतीच समोर आली आहे.


येथे उभ्यानेच केली जाते डिलिव्हरी
पीडित महिला महेसाणा जिल्ह्यातील कनडा गावातील रहिवासी आहे. रामी बेन गौतमभाई ठाकोर असे या महिलेचे नाव आहे. रामी शुक्रवारी असह्य प्रसव वेदनेसह आपल्या सासूसोबत रुग्णालयात गेली होती. कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, आरोग्य केंद्रात त्यांना कुणीही प्रवेश दिला नाही. बाळ फरशीवर पडले तेव्हा सुद्धा नर्स आणि रुग्णालय प्रशासनावर काहीच फरक पडला नाही. रक्तस्राव होत असल्याचे पाहता तेथील नर्सने पीडित महिलेची साडी उतरवली आणि त्यानेच रक्त पुसले. जालोत्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी महिलांना अशाच प्रकारे उभे करून डिलिव्हरी करण्यात आल्या असा आरोप आहे.


रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले...
जालोत्रा आरोग्य केंद्राच्या डॉ. मोनिका पटेल यांनी पीडितेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. आमच्या रुग्णालयात कुठल्याही महिलेला अशा प्रकारच्या वेदना दिल्या जात नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसव वेदनेसह आलेल्या एक किंवा दोन महिलांची प्रसूती अशा पद्धथीने झाली असावी. परंतु, आम्ही सर्वांनाच अशा पद्धतीने उभे करून वेदना देतो असे नाही. प्रशासनाच्या या अमानुष वर्तनाच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...