आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त १२ तासांचे लग्न, दुपारी ३ वाजता फेरे; रात्री ३ वाजता मोडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मितेश ब्रह्मभट्ट

अहमदाबाद - नवरदेव दिल्लीहून सोमवारी वरात घेऊन अहमदाबादला दाखल झाला. दुपारी ३ वाजता लग्न लागले. सायंकाळी ७ वाजता स्वागत समारंभही पार पडला, परंतु दरम्यान एका वैवाहिक विधीला वराने नकार देताच दोन्ही पक्षात वाद सुरू झाले. त्यानंतर नवरा-नवरी, सर्व वऱ्हाडी मंडळी पोलिस ठाण्यात गेली. लग्न मोडण्याचा निर्णय करूनच दोन्ही पक्ष ठाण्यातून माघारी वळले. नवरदेव नवरीला न घेताच दिल्लीला परतला. हे प्रकरण अहमदाबादेतील सोला भागातील आहे. पोलिस निरीक्षक जे. पी. जडेजा यांनी सांगितले, रात्री ३ वाजेपर्यंत मानपान सुरू होते. शेवटी वर-वधूने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाद पेटला. प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. दोघांनी तक्रार देण्यास नकार दिला. यामुळे केवळ जबाब घेऊन त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. वर-वधूसोबत ३०० वऱ्हाडी होते. रात्री ९ वाजता दोन्ही पक्षातील पोलिस ठाणे परिसरात दोन्हीकडील ज्येष्ठ लोकांनी बाजू सांभाळून नेण्याविषयी दोघांचीही समजूत काढली. स्वागत समारंभानंतर ८ वाजेनंतर वादास सुरुवात झाली. दूध पाजण्याचा विधी होता. नवरदेवाने आक्षेप घेतला आणि वधू-वरात भांडण लागले. मांडवात लोकांमध्ये थट्टा मस्करी सुरू असतानाच वादास सुरुवात झाली आणि लग्न मोडले.