आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जामनगर- गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राथमिक तपासात समोर आल्यानुसार, घरातील आर्थिक तंगीमुळे फरसाण व्यापाऱ्याने पत्नीसह कुटुंबातील आणखी तीघांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले आहे. पाच मृतांमध्ये दिपकभाई साकरिया (वय35), आरती (वय32), जयाबहन साकरिया (वय70), कुमकुम (वय10) आणि हेमंत (वय5) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व मृत देहांना शवविच्छेदनासाठी पाठवले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत दिपकभाई यांचे वडील मंगळवारी सकाळी वरच्या खोलीतून चहा घेण्यासाठी खाली आले तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी तातडीने अॅंम्बुलेंसला बोलावले परंतू त्याआधीच सर्वांची प्राणज्योत मालवली होती. मृत दिपकभाई यांना एक भाऊ असून तो राजकोटमधील आश्रमात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आईवर उपचार सुरू असल्यामुळे घरात होती आर्थिक तंगी
मृत दिपकभाई यांच्या मावसभावाने सांगितल्यानुसार, आईवर उपचार सुरू असल्यामुळे मृत दिपकभाईंच्या घरात अनेक महिन्यांपासून आर्थिक तंगी सुरू होती. व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे दिपकभाई मानसिक तणावात होते. त्यांच्या आईला हृदयाचा आजार होता. त्यामुळे दर महिन्याला त्यांच्या उपचारासाठी 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस याप्रकरणी आणखी तपास करणार असून या आत्महत्या नेमकी आर्थिक तंगीमुळेच झाली की आणखी कशामुळे? याचा शोध घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.