आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gujarat : Nityanand Who Taking Children Hostage In The Ashram Ran Abroad MEA Kept Gathering Information

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलांना आश्रमात ओलिस ठेवणारा आरोपी नित्यानंद देश सोडून फरार, पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली मदत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - वादग्रस्त स्वयंभू बाबा नित्यानंद देश सोडून फरार झाला आहे. तो कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. गुजरात पोलिसांनी आश्रमात अल्पवयीन मुलांना कैद करून ठेवण्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आश्रमातील दोन महिलांना अटक केल्यानंतर नित्यानंद देश सोडून पळून गेल्याचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी त्याच्या प्रत्यर्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयासाठी संपर्क साधणार असल्याचे सांगितले. आरोपी नित्यानंद विरोधात कर्नाटकात देखील बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. मंत्रालयातील प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले की, नित्यानंदच्या भारत सोडून फरार होण्याबाबत पोलिस किंवा गृह मंत्रालयाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. तो एखाद्या देशात हे देखील माहीत नाही. आम्हाला त्याचे नागरिकत्व आणि ठिकाणाबाबत माहिती गोळा करावी लागेल. यानंतर नित्यानंदला परत आणण्याची प्रक्रिया सुरु करता येईल. 

बातम्या आणखी आहेत...