आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat : The Family Flew 90 Lakh Notes At The Son's Wedding, Donations Will Be Given To The Cowsheds

कुटुंबाने मुलाच्या लग्नात उधळल्या तब्बल 90 लाखांच्या नोटा, व्हिडिओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनगर - येथे झालेल्या एका लग्नात परिवाराने तब्बल 90 लाख रुपयांच्या नोटा नवरदेवावर उधळल्या. यामुळे हा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. शनिवारी लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील चेला गावातील जडेजा परिवाराचा हा विवाह होता. 

नवरदेव ऋषिराज जडेजाने हेलिकॉप्टरद्वारे वधूची विदाई करत कुनड या गावी घेऊन गेला. नवरदेवाच्या मोठा भावाने एक कोटी रुपयांची कार भेट म्हणून दिली. परिवाराच्या मते, लग्नात उधळले गेलेले पैसे पाच गावांतील गोशाळेत दान देण्यात येणार आहे.