आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर लुटण्यासाठी आले होते चोरटे, CCTV पाहताच केला घूंघट डान्स; VIDEO झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरातच्या राजधानीत एका इमारतीमध्ये सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण आहेत. लोक हा व्हिडिओ पाहताक्षणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यात एकूणच 5 चोर दिसून येतात. ते सगळेच घर लुटण्यासाठी पोहोचले होते. त्याचवेळी त्यांची नजर तेथे लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर गेली. यानंतर चोरांनी जे काही केले त्यावर हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्यांनी कॅमेरा पाहताच अंगावर ब्लँकेट घेतला आणि स्वतःला लपवून चक्क घूंघट डान्स केला. 


व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की 5 चोर एका घरात दाखल झाले. त्यांनी चोरी केली आणि तेथून निघाले होते. त्याचवेळी एका चोरट्याने सीसीटीव्ही पाहिला. मग काय, त्याने वेळीच आपल्या हातातील चादर डोक्यावर पदरप्रमाणे घेतली आणि ठुमके लावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी या चोरट्यांनी दोन घरांमध्ये चोरी केली. दोन्ही फ्लॅटमधून त्यांनी लाखोंचे रोकड आणि सोने लुटले. त्यांच्या विरोधात दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, चोरट्यांना लूट करताना थोडीशीही भीती वाटली नाही. ते पूर्ण तयारीने आले होते असेही या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...