आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमार करणाऱ्या गुजराती अल्बम अभिनेत्रीला सहकाऱ्यांसह अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - डान्स कार्यक्रमांच्या बहाण्याने बाेलावून लोकांना लुटणाऱ्या गुजराती अल्बमच्या एका अभिनेत्रीसह तिच्या इतर दाेन सहकाऱ्यांना अटक करण्यात अाली अाहे. या अभिनेत्रीने ‘वन्स मोअर बेवफा’ व ‘जानू मारी दगाबाज’ अादी गुजराती अल्बममध्ये काम केले अाहे. लूटमार झालेल्यांनी पाेलिसांत जाऊ नये म्हणून ती त्यांचे नग्न व्हिडिअाे बनवून व्हायरल करण्याची धमकीही देत हाेती. याप्रकरणी रामोल पाेलिस ठाण्यात तीन जणांनी तक्रारी दिल्या अाहेत. संजना ऊर्फ संजू दुर्गेशभाई परमार व मोईन अली सय्यद अशी या मुख्य अाराेपींची नावे अाहेत. ती प्रथम डान्स कार्यक्रमास येणाऱ्यांशी मैत्री करायची व नंतर कुठे तरी बाेलवायची. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना लुटायची, असे पाेलिसांनी सांगितले.

 

अभिनेत्री संजनाविरुद्ध तिघांनी दिल्या तक्रारी 

1. रामोल पाेलिस ठाण्यात तक्रार करणाऱ्या प्रताप गोहिल यांनी सांगितले की, संजनाने डान्स कार्यक्रमास बाेलावल्यानंतर तिच्या सहकाऱ्यांसह मला निर्मनुष्य जागी नेऊन मारहाण केली. तसेच एक लाख ८० हजार रुपये किमतीची ६ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतली. याशिवाय सहकाऱ्यांच्या मदतीने नग्न व्हिडिअाेदेखील बनवला. 

 

2. वटवा येथील शहजाद खान पठाण यांनाही संजना व तिच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली व ४,५०० रुपये राेख अाणि मोबाइल हिसकावून घेतला. ती लोकांना नृत्य कार्यक्रमांचा बहाणा करून बाेलावते व सहकाऱ्यांसाेबत लूटमार करते, असे शहजाद पठाण यांनी सांगितले.    


3. संजना व तिच्या सहकाऱ्यांनी वस्त्राल येथील शैलेश पटेल यांचाही लूटमार करून नग्न व्हिडिअाे बनवला. याप्रकरणी पाेलिसांनी संजना, मोईन अली व त्याचा चुलत भाऊ या तिघांना अटक केली अाहे. तसेच तिच्या घरातून २ लाख ५४ हजारांच्या  वस्तूही जप्त केल्या अाहेत.

 

माैजमजेसाठी लुटायची

संजनाचा पती बेरोजगार अाहे. स्वत:चे शौक पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने लूटमार सुरू केली. ती पतीला साेडून रामोल येथे राहत हाेती. यादरम्यान तिची भेट मोईन अलीशी झाली. ती अनेक महिने मोईनसाेबत एकाच घरात राहिली; परंतु अाॅक्टाेबरमध्ये दोघांत वाद झाला. त्यामुळे संजनाने मोईनविरुद्ध अपहरण व लूटमारीची तक्रार दिली हाेती.

बातम्या आणखी आहेत...