सुरत / गुजराती तरुणाचे हृदय धडकतेय युक्रेनच्या तरुणीच्या हृदयात

एप्रिल २०१७ मध्ये ब्रेन डेड झाल्याने पालंकांनी केले अवयव दान 

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 13,2019 10:18:00 AM IST

सुरत - छायाचित्रात दिसणारे सुरतचे देवाणी दांपत्य आणि युक्रेनची नातालिया. या दोहोंमध्ये त्यांच्या मुलामुळे “हृदयाचे’ नाते जोडले गेले आहे. देवाणी दांपत्याचा मुलगा रवी देवाणी याचा एप्रिल २०१७ मध्ये ब्रेन डेड झाला होता. त्यांनी रवीचे हृदय, किडनी व यकृत, पॅनक्रियाज व डोळे दान केले. रवी देवाणीचे हृदय मुंबईत युक्रेनची तरुणी नातालियावर प्रत्यारोपित करण्यात आले. फक्त ८७ मिनिटांत हृदय मुंबईत आणण्यात आले होते. यशस्वी उपचारानंतर नतालिया युक्रेनला परतली.

X
COMMENT