आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब...एका दिवसात 35 किलो अन्न फस्त करत होता 'हा' बादशाह, जेवणानंतर स्वीटमध्ये खायचा 4 किलो गोड भात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - आपणही जर खाद्यपदार्थांकडे आकर्षित होत असाल तर आपण नक्की फूडी आहात. पण या बादशाहासमोर चांगले-चांगले फूडी टिकाव धरू शकले नसते. माणूस खाण्यासाठी कमवतो पण एखाद्याने ही गोष्ट गांभीर्याने घेतली तर तेव्हापासून त्याचे खान्याविषयीची ओढ प्रचंड वाढते. 

 

> या जगात कोणी खाण्याचा खूपच शौकिन होता तर तो गुजरातचा सहावा सुल्तान बादशाह महमूद बेगडा होता. हा बादशाह त्याच्या पराक्रमासाठी जेवढा प्रसिद्ध होता, त्यापेक्षाही जास्त तो त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे जास्त प्रसिद्ध होता. इ.स.1459-1511 या दरम्यान वयाच्या तेराव्या वर्षापासून ते 53 व्या वर्षापर्यंत याने गुजरातमध्ये शासन केले. त्याकाळातील जास्त काळ शासन केलेला राजा होता. सुल्तान महमूद बेगडा यांचे शरीर धष्टपुष्ट होते. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि त्यांची दाढी कमरेपर्यंत पोहचत होती. त्यांच्या मिशा देखील खूप लांब होत्या. इतक्या लांब की, ते आपल्या मिशांना डोक्याच्या मागे बांधत होते. त्यांच्या धष्टपुष्ट शरीराला जास्त प्रमाणात अन्नाची गरज होती. त्यांच्या खाण्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध आहे. अस म्हणल्या जाते की, ते जास्त प्रमाणात जेवत होते. तर अशाच खाण्याच्या शौकिन असणाऱ्या बादशाहविषयी आम्ही आपणास सांगत आहोत.

 

त्यांच्या खाण्याविषयीच्या काही खास गोष्टी 


सुल्तानचा नाश्ता

> साधारण माणसाचे जेवढे जेवण असते त्याहूनही जास्त सुल्तानचा नाश्ता होता. सुल्तान त्यांच्या नाश्त्यात एक कटोरी मध, एक कटोरी लोणी आणि शे-दि़डशे केळे खात होते. 


दिवसभरात फस्त करत होते 35 ते 37 किलो अन्न 

> फारशी आणि युरोपीयन इतिहासकारांचा असा विश्वास होता की, सुल्तान महमूद बेगडा भरपूर जेवत होते. या इतिहासकारांनी सुल्तान एका गुजराती टीले इतके म्हणजेच जवळपास 35 ते 37 किलो अन्न फस्त करत असल्याचा उल्लेख त्यांच्या गोष्टींमध्ये केला आहे. 

 

जेवणानंतर खात होते स्वीट 
> सुल्तानला जेवण झाल्यानंतर गोड खायची सवय होती. जेवणानंतर त्यांना एक किंवा दोन कटोरी गोड पदार्थ खाणे पसंत होते. गोड खाण्याच्या बाबतही ते सर्वांच्या पुढे होते. कारण डिर्सटमध्ये 4.6 किलो गोड भात खात होते.  


रात्रीच्या जेवणाची व्यवस्था

> दिवसभरात इतकं सगळं खाल्यावर कोणाला भूक लागणार नाही पण सुल्तान महमूद बेगड़ा यांच्याबाबतीत हे घडत होते. कारण रात्री अचानक लागलेल्या भूकेमुळे सुल्तान परेशान होऊ नये यासाठी त्यांच्या उशाच्या दोन्ही बाजूंना मांसाचे समोसे ठेवण्यात येत होते. यामुळे सुल्तान रात्री लागणाऱ्या भूकेला शांत करत होते. 

 

जेवणात विष
> युरोपीयन इतिहासकार बारबोसा आणि वर्थेमानुसार सुल्तानवर एकदा जेवणातून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हापासून सुल्तानला रोज थोड्याफार प्रमाणात विष दिले जात होते. जेणेकरून त्यांची पाचन शक्ती विष पचवण्यास सक्षम होईल. असे म्हणल्या जाते की, त्यांनी वापरलेल्या कपड्यांनी कोणीही स्पर्श करत नव्हते. कारण त्यांचे कपडे विषारी होत असल्यामुळे त्यांना जाळत होते.

 

> बादशाह महमूद बेगड़ा यांच्या खान्याच्या शौकावर अनेक कथा लिहीण्यात आल्या आहेत. सोबतच त्यांच्या जेवणात विष मिळवल्याच्या गोष्टीला प्रामुख्याने दर्शविण्यात आले आहे. इतिहासकारांनी या खाण्याच्या शौकिन असणाऱ्या सुल्तानला खूपच प्रचलित केले होते. 

बातम्या आणखी आहेत...