आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जयपूर - राजस्थानात पाच टक्के आरक्षणाची मागणी करणाऱ्या गुर्जर समाजाच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले आहे. धौलपूरमध्ये महापंचायतनंतर गुर्जरांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 रोखून धरला. पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंसाचार उफाळून आला. आंदोलकांनी चक्क पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. काही मिनिटांतच आंदोलन इतके चिघळले की पोलिसांची वाहने जाळण्यात आली आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी यानंतर पोलिसांनीही हवेत फायरिंग केली. या हिंसाचारात 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गांसह रेल्वे वाहतूक ठप्प
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 148 डी बूंदी, भीलवाडा आणि गुलाबपुरा पर्यंत जाम करण्यात आला आहे. आंदोलक सोमवारपर्यंत हा रस्त बंदच ठेवतील अशी शक्यता दिसून येत आहे. सवाई माधोपूरच्या मलारना डूंगरमध्ये रेल्वे रुळांवर आंदोलक बसले आहेत. त्यांचे मन वळवण्यासाठी शनिवारी सरकारच्या वतीने पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह आणि सहकारी रेजिस्ट्रार नीरज के पवन रेल्वे ट्रॅकवर पोहोचले होते. परंतु, या चर्चेतून काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी सलग दुसऱ्या दिवशी या रेल्वे मार्गावरून वाहतूक बंद आहे. त्यातच गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राधाकृष्ण पोसवाल यांनी सोमवारपासून जिल्ह्यात गुर्जर समाज दुग्ध पुरवठा बंद करणार असा इशारा दिला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.