रॉयल अकेडमी ऑफ म्यूझिकचे गोल्ड मेडलिस्टही आहेत
दिव्य मराठी वेब
Sep 17,2019 02:21:24 PM ISTएंटरटेन्मेंट डेस्क : राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित असलेले 92 वर्षांचे संगीतकार वनराज भाटिया खूप हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत आहेत. रिपोर्ट्सनुसार ते मुंबईच्या एका अपार्टमेंटमध्ये एकटेच राहात आहेत. ते कोणत्यातरी आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या गुडघ्यामध्ये वेदना होतात, ज्यामुळे त्यांना पलंगावरून उठणे आणि चालणे फिरणेदेखील कठीण झाले आहे. ऐकू येणेही जवळपास बंद झाले आहे आणि त्यांची समटूतीदेखील गेली आहे. ना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आहेत ना कमावण्याचे आणि गुजराण करण्याचे काही साधन आहे.
कॅनडामध्ये राहाते वनराज यांची बहीण...
रिपोर्ट्सनुसार, वनराज यांनी लग्न केले नाही, त्यांची एक बहीण आहे, जी कॅनडामध्ये राहाते. मुंबईमध्येदेखील त्यांचे काही नातेवाईक आहेत, जे थोडी फार आर्थिक मदत करतात. सुजीत कुमारी नावाची एक मोलकरीण त्यांची काळजी घेत आहे. ती त्यांच्या घरातील कामेदेखील करते. भाटिया यांनी एका बातचितीमध्ये सांगितले होते कि, त्यांनी आपले सर्व पैसे शेअर बाजारात लावले होते, जे वर्ष 2000 च्या सुमारास मार्केटमध्ये बुडाले. याचमुळे त्यांच्याकडे कोणतीही बचत नाहीये.
क्रॉकरीविकून सुरु आहे गुजराण...
वनराज यांच्याकडे डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि औषधी खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. मुंबई मिररसोबतच्या बातचितीमध्ये त्यांची मोलकरीण सुजीतने त्यांच्या काही ब्रिटिश क्रॉकरी दाखवल्या. सुजीतनुसार, रोजच्या खर्चासाठी हि क्रॉकरी विकली जात आहे. रिपोर्टमध्ये हेदेखील म्हणते आहे की, वनराज हे भाड्याच्या घरात राहतात. ज्याचे भाडे काही सामाजिक संगठनांचे लोक मिळून देतात.
2012 मध्ये मिळाला होता पद्मश्री पुरस्कार...
वनराज भाटिया यांना 1988 मध्ये आलेला चित्रपट 'तमस' साठी सर्वश्रेष्ठ संगीतकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट गोविंद निहलानीने दिग्दर्शित केला होता. ओम पुरी, दीपा साही, भीष्म साहनी आणि सुरेखा सीकरी यांच्या यामध्ये मुख्य भूमिका होत्या. 2012 मध्ये संगीत आणि कलेमध्ये महत्वपूर्ण योगदानासाठी भारत सरकारने वनराजला पद्मश्रीने सन्मानित केले होते.
रॉयल अकेडमी ऑफ म्यूझिकचे गोल्ड मेडलिस्ट...
1927 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेले भाटिया लंडनच्या रॉयल अकेडमी ऑफ म्यूझिकचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. ते दिल्ली यूनिव्हर्सिटीच्या वेस्टर्न म्यूझिक डिपार्टमेंटचे इंचार्जदेखील होते. त्यांनी हजारो जाहिरातींच्या जिंगल्स, चित्रपट आणि टीव्ही मालिकांना संगीत दिले आहे.
श्याम बेनेगल यांच्या 9 चित्रपटांना दिले संगीत...
भाटिया यांनी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या 9 चित्रपट 'अंकुर', 'भूमिका', 'मंथन', 'जुनून', 'कलयुग', 'मंडी', 'त्रिकाल', 'सूरज का सातवां घोड़ा' आणि 'सरदारी बेगम' मध्ये संगीत दिले. याव्यतिरिक्त 'जाने भी दो यारो' आणि 'द्रोह काल' यांसारख्या चित्रपटांनाही त्यांचे संगीत आहे. त्यांनी सीरियल 'भारत एक खोज' चे गाणे 'सृष्टि से पहले सत्य नहीं था' लाही संगीत दिले होते. त्यांनी संगीतबद्ध केलेले गाणे 'हम होंगे कामयाब' (जाने भी दो यारो" आणि 'मारे गाम काथा पारे' (मंथन) हे खूप प्रसिद्ध झाले.