आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP Leader Murder: भाजपच्या दिग्गज नेत्याचा खून; धावत्या ट्रेनमध्ये झाडल्या गोळ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते जयंतीलाल भानुशाली यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी गोळी डोळ्यात लागली. या हल्ल्यातून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिस दलाने दिलेल्या माहतीनुसार, जयंतीलाल ट्रेन क्रमांक 19116 सयाजी नगरी एक्सप्रेसमधून  अहमदाबादच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान सोमवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

 

रेपच्या आरोपांमुळे होते चर्चेत
जयंतीलाल अब्दसा मतदार संघातून आमदार होते. नुकतेच एका तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचे आरोप लावले होते. यानंतर त्याच तरुणीने गुजरात हायकोर्टात या प्रकरणी संबंधित नेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये असे आवाहन केले होते. पीडित आणि जयंतीलाल यांच्यात कोर्टाबाहेर तोडगा काढण्यात आला होता. तत्पूर्वी सुरत क्राइम ब्रांचने या प्रकरणाचा तपास केला होता. पीडितेने पोलिसांना तक्रार दिली होती की एका फॅशन डिझाईन कोर्समध्ये अॅडमिशन घेताना एका नातेवाइकाने तिची भेट जयंतीलाल यांच्याशी करून दिली होती. यानंतर जयंतीलाल यांनी तिला अहमदाबादला बोलावून घेतले. तसेच एका कारमध्ये बसवून अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणानंतर पक्षाने त्यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई सुद्धा केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...