आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक लोक फक्त फुटाणे खातात. परंतु फुटाण्यांसोबत गूळ खाल्ला तर अनेक आरोग्य फायदे वाढतात. राजस्थान आयुर्वेदिक युनिव्हर्सिटी, जोधपूरचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अरुण दधीच सांगत आहेत, पुरुषांनी गूळ आणि फुटाणे खाण्याच्या १० फायद्यांविषयी. महर्षी आयुर्वेद हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या डॉ. भानु शर्मा सांगत आहेत, गुळाचे असे आरोग्यदायी समीकरण जे प्रत्येक वातावरणात फायदेशीर आहेत...
- गुळासोबत अद्रक खाल्ल्याने सांध्याच्या दुखण्यावर आराम मिळतो.
- गूळ आणि काळे तीळ खाल्ल्याने दम्यापासून बचाव होतो.
- गुळासोबत तूप मिसळून खाल्ल्याने कानदुखीची समस्या दूर होते.
- गुळासोबत सुंठ मिसळून खाल्ल्याने काविळीमध्ये फायदा होतो.
जाणून घ्या गूळ आणि फुटाण्याच्या फायद्यांविषयी...
- फुटाण्यांसोबत गूळ खाल्ल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. हे पुरुषांच्या त्वचेसाठी फायदेशीर असते.
- यामध्ये फॉस्फरस असते. यामुळे दात मजबूत होतात.
- गूळ आणि फुटाण्यांमध्ये प्रोटीन अधिक असते. हे स्नायू मजबूत करण्यात मदत करते.
- फुटाणे आणि हरभऱ्यामध्ये फायबर असते. हे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
- यामध्ये अमिनो अॅसिड्स, ट्रिप्टोफेन आणि सेरेटोनिन असते. यामुळे तणाव कमी होतो. हे उदासीनतेपासून बचाव करण्यात मदत करते.
- फुटाण्यांसोबत गूळ खाल्ल्याने बॉडीचा मेटाबॉलिझम वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते.
- यातील पोटॅशियम हार्ट अॅटॅक टाळण्यास मदत करते.
- यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. यामुळे मेंदूची शक्ती आणि स्मरणशक्ती वाढते.
- फुटाणे आणि गुळामध्ये झिंक असते. हे चेहऱ्याची चमक वाढवण्यात मदत करते. हे खाल्ल्याने स्मार्टनेस वाढतो.
- यामध्ये कॅल्शियम असते. हे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.