आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्याने आपला प्रायव्हेट पार्ट हातात घेतला आणि म्हणाला- तुला पाहून मी उत्तेजित होत नाही, तर प्रेक्षकांना कशी मजा येईल!', 'गुलाब गँग'च्या अॅक्ट्रेसने सांगितली आपबीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवुडमध्ये सुरू असलेल्या #MeToo मोहिमेमध्ये आता 'लव्ह सेक्स और धोका' तसेच 'गुलाब गँग'सारख्या चित्रपटांत काम केलेल्या प्रियंका बोसने आपली आपबीती ऐकवली आहे. एका इंग्रजी एंटरटेनमेंट वेबसाइटशी बोतलाना प्रियंकाने स्क्रिप्ट राइटर-डायरेक्टर सौमिक सेन, पाकिस्तानी अॅक्टर अली खान, डायरेक्टर अनुराग कश्यप आणि साजिद खानवर आरोप केले आहेत. प्रियंका म्हणाली- साजिदने सोफ्यावर झोपून आपला प्रायवेट पार्ट हातात घेतला होता...

 

- प्रियंकाने 'हिम्मतवाला' आणि 'हमशकल्स' यासारख्या चित्रपटांचा डायरेक्टर साजिद खानसोबत आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांचा उल्लेख करत म्हटले, "त्याने मला एका ऑडिशनसाठी बोलावले होते. तिच्या असिस्टंटने म्हटले की, मी बिकिनीमध्ये कम्फर्टेबल असले पाहिजे. जेव्हा मी तेथे पोहोचले तेव्हा त्याने (साजिद खान) कोणतीही रिअॅक्शन नाही दिली. तो सोफ्यावर जाऊन झोपला. मग त्याने ट्राउझर वर करून आपला प्रायव्हेट पार्ट हातात घेतला आणि म्हणाला- जर तुला पाहून मी उत्तेजित होत नाहीये, तर प्रेक्षकांना कशी मजा येईल. मी तिथून पळतच घराकडे निघाले. पूर्ण रस्त्यात रडत होते. मला आठवत नाही की मी तिथून कशी निघाले. डोळ्यांसमोर धुसर होते. मी जेव्हा माझ्या पार्टनरला सांगितले की, माझ्यासोबत काय झाले, तेव्हा त्याने मला ताबडतोब इंडस्ट्री सोडण्याचे सांगितले. परंतु मी असे काही केले नाही. तर येथेच राहून धाडसाने सामना करण्याचे ठरवले." साजिद खानवर प्रियंकाच्या आधी सलोनी चोप्रा आणि सिमरन सूरीसहित अनेक अॅक्ट्रेसेस तसेच जर्नलिस्टने सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोप केलेला आहे.

 

'सौमिक सेनने केला होता एक्स्ट्रा फ्रेंडली होण्याचा प्रयत्न'
- 2014 मध्ये 'गुलाब गँग'चे दिग्दर्शन केलेल्या सौमिक सेनबद्दल प्रियंका म्हणाली, "जेव्हा मी त्यांच्यासोबत फिल्म (गुलाब गैंग) करत होते, तेव्हा त्याने माझ्याशी एक्स्ट्रा फ्रेंडली होण्याचा प्रयत्न केला होता. तो मला म्हणायचा की, मी खूप सेक्सी आहे. त्याला माझ्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हवे होते. तो म्हणतो की, अॅक्ट्रेसेस आणि डायरेक्टर्समध्ये रिलेशनशिप असली पाहिजे. मी त्याला माझ्या पार्टनरचा फोटो दाखवला आणि म्हटले की- माझे एकासोबत रिलेशनशिप आहे. आणि जर मला एक्स्ट्रा रिलेशनशिपची गरज पडलीच, तर ती तुझ्यासोबत नसेल.


अली खानवर प्रियंकाचा गंभीर आरोप
- 'डॉन 2' आणि 'अनफ्रीडम' यासारख्या चित्रपटांत काम केलेल्या पाकिस्तानी अॅक्टर अली खानबद्दल प्रियंका म्हणाली, "मी काही वर्षांपूर्वी त्याच्यासोबत एक चित्रपट केला होता. तेव्हा आमची एकदा डिनरवर भेट झाली होती. त्या वेळी तो जोरात ओरडून म्हणाला होता, आसपास किती कंटाळवाणे आहे, कारण डिनरवर मी एकमेव महिला होते. त्यानंतर कधीही त्याच्याशी भेटण्याची इच्छा झाली नाही. परंतु दुर्भाग्याने  नुकत्याच एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो आला आणि माझ्या आयुष्याबाबत चौकशी करू लागला. तो बेशरमपणे म्हणाला - तुझ्यासारख्या फेमनिस्टसेाबत तुझा पार्टनर आतापर्यंत कसा आहे? पार्टीच्या अखेरीस त्याने नशेत मला म्हटले- ''मला माझ्या आसपास फेमनिस्ट नकोय, मला तर बायकांच्या फक्त बायकांच्या ब्रेस्टच्या मध्ये माझे डोके ठेवायचे आहे.''

 

अनुराग कश्यपबद्दल प्रियंका म्हणाली...
- प्रियंकाने अनुराग कश्यपसोबत 'देव डी' चित्रपटादरम्यान घडलेल्या प्रसंगाबाबतही सांगितले, "मी तीन महिन्यांपर्यंत ब्रेस्टफीडिंग केल्यानंतर मित्रांसेाबत फिरेन, काही ड्रिंक्स घेईन असा विचार करून घराबाहेर निघाले होते. त्या रात्री जेव्हा अनुराग कश्यपसोबत भेट झाली तेव्हा तो नशेत होता आणि मला पाहिल्यावर त्याची पहिली रिअॅक्शन होती की, मी तेथे काय करतेय? मी तर घरीच असायला पाहिजे आणि मुलाची देखभाल करायला पाहिजे." प्रियंका पुढे म्हणते, "आभार, अनुराग कश्यप कॅजुअल सेक्सिज्मसाठी. त्या रात्री मी घरी परत गेले, पण यानंतर 9 वर्षे मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही पडली. माझा मुलगा वर्किंग आईसोबत खूप चांगल्या रीतीने वाढला. जसा तुमचा मुलगा मोठा झाला. आपण दोघेही लकी आहोत."

 

 

बातम्या आणखी आहेत...