आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३३ वर्षांच्या गुलालाई इस्माईलने महिन्यापूर्वी जिवाच्या भीतीने पाक साेडून अमेरिका गाठले, आता पीडितांसाठी लढणारा चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क - ३३ वर्षीय गुलालाई इस्माइल पाकिस्तानच्या अत्याचार पीडित लाेकांसाठी आशेचा नवा किरण हाेऊन उदयाला आल्या आहेत. त्यात न्यूयाॅर्कमध्ये पाकिस्तानविराेधी आंदाेलनाचे नेतृत्व करू लागल्या आहेत. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या गुलालाई इस्माइल यांनी याच वर्षी आॅगस्टमध्ये स्वत:चा प्राण मुठीत घेऊन अमेरिका गाठली हाेती. न्यूयाॅर्कमध्ये एक महिन्यापूर्वी आलेल्या गुलालाई पाकिस्तानात दशकांपासून पाकिस्तानचे अत्याचार, छळ साेसणाऱ्या अल्पसंख्यांकांची शाेकांतिका जगासमाेर मांडू लागल्या आहेत. शुक्रवारी संयुक्त महासभेत इम्रान भाषण देत हाेते. तेव्हा त्या संयुक्त राष्ट्राच्या बाहेर एका आंदाेलनाचे नेतृत्व करत हाेते. गुलालाईंची आपबीति अशी...
 

माझे कुटुंब, बाहेर काढणाऱ्या भूमिगत नेटवर्कची चिंता : गुलालाई
पाकिस्तानात दहशतवादाचा खात्मा करण्याच्या नावाखाली निष्पाप पख्तुनच्या नागरिकांची कत्तल केली जात आहे. नजरबंद केंद्रांत हजाराे लाेकांना कैद केले जात आहे. पाकिस्तान सैन्याच्या यातनागृहांत निष्पाप लाेकांना यातना दिल्या जात आहेत. पाक लष्कर मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. त्याला राेखले पाहिजे. त्यांच्या यातनागृहांत दडपलेल्यांची सुटका करण्यात यावी. आम्ही त्याच्याविराेधात भूमिका घेतली तर आम्हाला दहशतवादी ठरवले जाते. लष्कर खैबर पख्तुनख्वामध्ये हुकूमशाहीने वागू लागले आहे. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते. मला माझ्या आई-वडिलांची चिंता वाटते. ते घरी आहेत. त्याशिवाय मला पाकिस्तानातून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी मदत करणाऱ्या भूमिगत नेटवर्कची देखील चिंता वाटते. पाकिस्तान सरकारने आपली सर्व यंत्रणा माझ्या मागे लावली आहे. माझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला यातना देण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी माझ्या कुटुंबावर दबाव टाकला. कुटुंबिय माझ्याविराेधात व्हावे, असे वाटते. मला यातना देण्यासाठी त्यांनी माझ्या आई-वडिलांवर खाेटे आराेप लावले. 
 
 

गुलालाई सहा महिने भूमिगत, मित्रांनी श्रीलंकेला पाेहाेचवले
​​​​​​​मशाल रेडिओचे अफगाणी पत्रकार बशीर अहमद गवाकला दिलेल्या मुलाखतीत गुलालाई म्हणाल्या, पाकिस्तानात मी सहा महिने लपून-छपून राहिले. अमेरिकेला येण्यापूर्वी काही मित्रांनी श्रीलंकेला जाण्यासाठी मदत केली हाेती. याचवर्षी गुलालाईने साेशल मीडियावर पाकिस्तानच्या सैनिकांच्या विराेधात साेशल मीडियावरून पाेस्ट केले हाेते. त्यानंतर त्यांची अवस्था आपल्याच देशात परक्यासारखी हाेऊन बसली. पाकिस्तानच्या महिलांवर अत्याचार व लैंगिक शाेषणाचा आराेप गुलालाई यांनी पाक सैनिकांवर केला हाेता. त्यामुळे त्यांच्यावर देशद्राेहाचा आराेप लावण्यात आला.