आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : गुलशन ग्रोवर यांनी शुक्रवारी आपली बायोग्राफी लॉन्च केली, ज्याचे नाव त्यांनी 'बॅड मॅन' ठेवले आहे. गुलशन हिंदी चित्रपटातील सर्वात चर्चित आणि आवडत्या खलानायकांपैकी एक आहे. आपल्या निगेटिव्ह भूमिकांमुळे त्यांना 'बॅड मॅन' या नावाने ओळख मिळाली. अभिनेत्यानुसार, अक्षय कुमारमुले त्यांनी आपल्या बायोग्राफीचे नाव 'बॅड मॅन' ठेवले. त्यांनी सांगितले, 'अक्षय मला म्हणाला होता की, ज्याप्रकारे 'खिलाडी' नाव त्याने आपल्या नावे रजिस्टर करून घेतले आहे तसेच मीदेखील 'बॅड मॅन' हे नाव कॉपीराइट करून घेतले. त्यामुळे मी बायोग्राफीचे नाव बॅड मॅन ठेवले.'
कुणालाही आपल्या बायोग्राफीपासून पैसे कमवायचे नसतात - गुलशन...
गुलशन यांनी बायोग्राफीमध्ये आपला संघर्ष सांगितलं आहे. याबद्दल अभिनेत्याने सांगितले, 'कुणीही आपली बायोग्राफी पैसे कमवण्यासाठी लिहीत नाही. जो कुणी लिहितो तो हाच विचार करून लिहितो की, लोकांना त्याचा संघर्ष कळावा आणि त्यांनी त्यापासून काहीतरी शिकावे. कोणतीच गोष्ट कुणालाही प्रगती करण्यापासून आणि पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. मीदेखील हे पुस्तक केवळ यासाठी लिहिले आहे की, जेणेकरून लोकांनी ते वाचावे आणि त्यांना हे कळावे की, तुमची बिकट आर्थिक परिस्थिती किंवा गरिबी तुमच्या यशाच्या आड येत नाही.'
बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही केले आहे काम...
गुलशन यांनी 'मोहरा', 'राम-लखन' आणि 'दिलवाले' यांसारख्या चित्रपटांत खलनायकाचा रोल साकारला आहे. त्यांनी 400 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. एवढेच नाही त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांतही काम केले आहे. ज्यामध्ये 'माय हॉलिवूड ब्राइड', 'प्रिजनर्स ऑफ द सन' आणि 'ब्लाइंड एम्बीशन' प्रमुख आहे.
मुंबईला येऊन केला संघर्ष...
आपल्या प्रवासाविषयी अभिनेत्यांनी सांगितले, 'मी मिडल क्लास फॅमिलीमधून आलो होतो. दिल्ली यूनिवर्सिटीमधून कॉमर्समध्ये ग्रॅजुएशन केले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर ठरवले की, अभिनयात करियर बनव्हायचे. माझ्या कुटुंबातून कुणीही या फील्डमध्ये आहे. तर मुंबईला येऊन खूप संघर्ष करावा लागला. पहिले अॅक्टिंग स्कूल जॉईन केले मग चित्रपटांसाठी ऑडिशन दिले.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.