Home | Flashback | Gulshan Kumar 21st Death Anniversary

21st Death Anni: कधी वडिलांसोबत ज्यूस विकायचे गुलशन कुमार, अशी उभी केली होती कोट्यवधींची इंडस्ट्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 12, 2018, 12:14 AM IST

बॉलिवूडमध्ये कॅसेट किंग या नावाने प्रसिद्ध गुलशन कुमार यांची आज 21 वी पुण्यतिथी आहे.

 • Gulshan Kumar 21st Death Anniversary

  एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये कॅसेट किंग या नावाने प्रसिद्ध गुलशन कुमार यांची आज 21 वी पुण्यतिथी आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील साऊथ अंधेरी परिसरातील जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

  1997 मध्ये गुलशन कुमार यांची गोळी झाडून केली होती हत्या...
  गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1951 रोजी दिल्लीतील एका पंजाबी अरोरा फॅमिलीमध्ये झाला होता. 12 ऑगस्ट 1997 ला मुंबईतील अंधेरी भागातील जीतेश्वर महादेव मंदिरा बाहेर गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. त्यांचे वडील चंद्रभान दुआ दिल्लीतील दरियागंज येथे ज्यूस विक्री करत होते.

  गुलशन कुमारांनी कशी सुरु केली म्यूझिक कंपनी
  - लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला.
  - ते 23 वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली.
  - त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.
  - गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते.
  - गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती.
  - इतर कंपन्यांच्या कॅसेट 28 रुपयांमध्ये मिळत असताना, त्याचवेळी 15 ते 18 रुपयात टी-सीरीजची कॅसेट देण्याची किमया त्यांनी केली होती.
  - त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते.
  - 70 च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले.
  - ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले.
  - बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.


  पुढील स्लाइडमध्ये वाचा, झाली होती गुलशन कुमारांची हत्या...

 • Gulshan Kumar 21st Death Anniversary

  कुणी घडवून आणली होती गुलशन कुमार यांची हत्या... 
  - 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी स्थित जीतेश्वर महादेव मंदिरात पूजेसाठी आलेल्या गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती.  
  - या हत्येमागे नदीम-श्रावण संगीतकार जोडीमधील नदीम सैफचा हात होता.  
  - असे म्हटले जाते, की त्यांच्या हत्येचा कट संगीतकार नदीमने दुबईत दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमसोबत मिळून रचला होता.  

   

 • Gulshan Kumar 21st Death Anniversary

  गुलशन कुमार यांचा वैष्णोदेवीला भंडारा... 

  - फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. 
  - दान-धर्मावर त्यांची श्रद्धा होती. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. 
  - त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आता त्यांच्या हत्येनंतरही तो भंडारा अविरत सुरु आहे. 
  - या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते. 
  - असे म्हटले जाते की अबु सालेमने गुलशन कुमार यांना दर महिन्याला पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली तेव्हा गुलशन कुमार यांनी त्याला उत्तर दिले होते, तुला खंडणी देण्यापेक्षा मी वैष्णोदेवीला आणखी एक भंडारा सुरु करेल.

 • Gulshan Kumar 21st Death Anniversary

  गुलशन कुमार यांची फॅमिली... 

  - गुलशन कुमार यांच्या निधनानंतर त्यांचा  मुलगा भूषण कुमारने T-Series कंपनीची धुरा सांभाळली होती. त्यावेळी भूषण कुमार केवळ 19 वर्षांचे होते.  
  - भूषण कुमार सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड (T- Series) के चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.  
  - आज T-series भारतातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी आहे.  
  - भूषणने 13 फेब्रुवारी 2005 रोजी मॉडेल आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस दिव्या खोसलासोबत जम्मू-काश्मीरस्थित वैष्णोदेवी मंदिरात लग्न केले होते.  
  - दोघांचा एक मुलगा असून रुहान हे त्याचे नाव आहे. रुहानचा जन्म 11 ऑक्टोबर 2011 रोजी झाला.  
  - गुलशन कुमार यांना तुलसी आणि खुशाली या दोन मुली आहेत. तुलसी कुमार प्लेबॅक सिंगर आणि खुशाली कुमार मॉडेल आणि डिझायनर आहे.  

Trending