आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - पुणे विद्यापीठ परिसरात शनिवारी भरदिवसा गोळीबार झाला. अज्ञात बाइकस्वारांनी एका युवकाला लक्ष्य केले. या गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बाइकवर आले होते. तसेच ते हल्ला करून सांगवीच्या दिशेने पसार झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिस पोहोचले असून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे.
अतिक्रमणात दुकान हटवल्यावरून झाला वाद...
समीर किसन येनपुरे (39, रा.मेहंदळे गॅरेज, एरंडवणे) असे जखमी तरुणाने नाव आहे. त्याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी शुक्राचार्य मदाले(रा.मेहेंदळे गॅरेज) याच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी येनपुरे याचा बोर्ड/ फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय आहे. तर आरोपी मदाले याची एरंडवणे भागात छोटीशी दुकान आहे. ही टपरी काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागणाने काढली होती. टपरी येनपुरे यानेच काढायला लावली असा मदाले याला वाटले होते. यातूनच त्याने येनपुरे याचा काटा काढण्यासाठी त्याच्यावर भर रस्त्यात गोळीबार केला. या वेळी रस्त्यावर वाहनचालकांची मोठी गर्दी होती. ही घटना पहाताच वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली. हल्ला करणारे दुचाकीस्वार हल्ला केल्यावर सुसाटपणे सांगवीच्या दिशेन पसार झाले. वाहनचालकांनी याची खबर तातडीने पोलीसांना कळवली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.