आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील कोळपेवाडीत दरोडा, गोळीबारात सराफ ठार; लाखोंचा ऐवज लांबवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील कोळपेवाडी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर रविवारी रात्री आठ वाजता दरोडा टाकण्यात आला. या वेळी सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक श्याम सुभाष घाडगे (३६) हे ठार झाले, तर गणेश सुभाष घाडगे (४२) हे जखमी झाले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. जखमी गणेश घाडगे यांच्यावर कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


२००६ मध्ये कोपरगाव शहरातील बाजारतळ भागात काल्या नांगऱ्याच्या टोळीने भरदिवसा साडेसहा वाजता तीन सराफी दुकानांवर फटाके फोडत दगडफेक करत सुमारे १० ते १५ लाखांचा ऐवज लुटला होता. कोळपेवाडी येथे रविवारी असाच प्रकार घडला. लक्ष्मी ज्वेलर्सचे नूतनीकरण सुरू आहे. या दुकानातील लाखो रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. बऱ्याच वेळानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. 


पोलिसांना घटनास्थळी बंदुकीतून झाडलेली काडतुसे मिळाली. मात्र, पोलिस त्यास दुजोरा देत नाहीत. या घटनेमुळे तालुक्यात दहशत पसरली अाहे. दरोडेखोरांच्या गोळीबारात मरण पावलेले श्याम घाडगे यांच्या मृतदेहाची कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक व पोलिसांचा मोठा ताफा होता. धारणगाव रोडवरील रुग्णालयात गर्दी जमली होती. 

बातम्या आणखी आहेत...