आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लहान मुलींच्या माघारी विवाहितेने घेतला गळफास, चिठ्ठीत लिहिले असे काही, वाचून सर्वांनाच बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरदासपूर (पंजाब) - ''खूप दिवसांपासून झोपले नाही, झोप येत नाही, बस आता मस्त झोपायचंय...।'' एवढे लिहिल्यानंतर एका विवाहितेने आपल्या रूममध्ये गुरुवारी रात्री पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये तिने यासाठी कुणालाही जबाबदार ठरवले नाही. फक्त मृत तरुणीच्या भावाकडून सासरच्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 28 वर्षीय हरप्रीत कौर असे मृत विवाहितेचे नाव आहे.

 

5 वर्षांपूर्वी झाले होते हरप्रीतचे लग्न
हरप्रीतचा भाऊ मलकित म्हणाला- बहिणीचे लग्न 5 वर्षांपूर्वी मोहितसोबत झाले होते. मोहित त्या वेळी गुरदासपुरमध्येच एक रेस्टॉरंट चालवत होता. बहिणीला सीरत (4) व अगम (3) या दोन मुली आहेत.


मलकित म्हणाला की, वर्षभरापूर्वी मोहित मुंबईला गेला आणि तेथे एका खासगी कंपनीत नोकरी करू लागला. हरप्रीतही काही दिवसांनी मुंबईला गेली होती. महिन्याभरापूर्वीच हरप्रीत मुलींसह गुरदासपूरमध्ये आपल्या सासरी आली होती, तर मोहित मुंबईतच राहत होता.

 

ती म्हणायची, एखाद्या दिवशी सुसाइड करीन

हरप्रीतच्या सासरचे नेहमी तिला रागवत राहायचे. याबाबत ती चॅटिंगमधून वेळोवेळी त्याला सांगत राहायची. सासरचा कोणताही सदस्य घरातले कोणतेही काम नव्हता करता, प्रत्येक जण बसून राहायचा. तर तिचा पतीही आपल्या आईवडिलांचीच बाजू घ्यायचा. हरप्रीत नेहमी म्हणायची की, मी एखाद्या दिवशी आत्महत्या करीन.

 

भावासाठी लिहिली सुसाइड नोट
सुसाइड नोटमध्ये लिहिले- ''मी जे करतेय ते माझ्या मर्जीने करत आहे. यात कुणाचाच दोष नाही. खूप दिवसांपासून झोपलेली नाहीये, झोप येत नाही, फक्त झोपायचं आहे. माझ्या मुलींकडे लक्ष द्या. सीरत-अगमला तिच्या आजोळी पाठवून द्या, त्यांना माझी कमी कधीच जाणवू देऊ नका. प्लीज, कोणत्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. आज मला मनभरून झोपायचं आहे. अगमकडे लक्ष द्या. सॉरी पण तुझ्यावर कोणताही भार टाकायचा नाही. मिस यू सो मच मम्मी. सॉरी भाऊ. सर्वांनी काळजी घ्या... -प्रीती''


याप्रकरणी माहिती देताना पोलिस अधिकारी कुलवंत सिंह म्हणाले की, या घटनेवरून मृत हरप्रीतच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...