आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हो मीच 9 चिमुरडींची रेपनंतर निर्घृण हत्या केली', नराधमाच्या कबुलीनंतर पोलिसही हादरले, राक्षसाच्या अटकेचा असा होता थरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - येथील सेक्टर-66 मध्ये 3 वर्षीय चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या केल्याप्रकरणी पकडलेल्या तरुणाने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. चौकशीत आरोपीने आतापर्यंत 9 बालिकांवर रेप आणि हत्या केल्याचे कबूल केल आहे. या सर्व मुली 3 ते 8 वर्षे वयाच्या होत्या. यापैकी 3 प्रकरणे गुरुग्रामची, 1 ग्वाल्हेरचे, 1 झांशीचे आणि 4 दिल्लीची आहेत. गुरुग्राम पोलिस आता दिल्ली, ग्वाल्हेर आणि झांशी पोलिसांशी संपर्क करून केसची माहिती गोळा करत आहेत.

 

असे होते प्रकरण...

12 नोव्हेंबरच्या सकाळी सेक्टर-66 एरियात तीन वर्षीय चिमुरडीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळला होता. ती 11 नोव्हेंबरपासून गायब होती. रेपनंतर निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती. रेप व हत्येचा आरोप जवळच्याच एका झोपडीत राहणाऱ्या सुनीलवर होता. पोलिसांनी त्याचे बहीण-भावजी आणि आईची चौकशी केली. यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्याला झांशीच्या मगरपूर गावातून अटक करण्यात आली.

 

'रेपच्या आधी तोडायचा पाय' 
9 मुलींची बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या सुनीलची पाशवी कृत्याची पद्धत हादरवून सोडणारी आहे. सुनसान जागेवर तो लहान मुलींना कुरकुरे किंवा चॉकलेटचे आमिष दाखवून न्यायचा आणि तेथे जाताच सर्वात आधी मुलीचे पाय तोडायचा, जेणेकरून तिला पळून जाता येऊ नये. यांनतर पाशवी बलात्कार करायचा. मग दगडाने डोक्याचा चेंदामेंदा करून हत्या करायचा. यानंतर मृतदेह कधी-कधी जागेवरच किंवा आजूबाजूला फेकून द्यायचा. प्रत्येक रेपनंतर तो दारू पिऊन एन्जॉय करायचा.

 

आरोपीला भंडाऱ्यात फुकटचे जेवण्याचा छंद

8 वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो काही दिवसांनीच घरातून निघून गेला होता. मागच्या 7 वर्षांपासून तो घरापासून वेगळा राहत होता आणि अशाच प्रकारे रस्त्यांवर फिरत होता. कुठेही एखाद्या अन्नदानात जेवण करायचा आणि जेव्हा दारूसाठी पैशांची गरज पडायची तेव्हा एक-दोन दिवसांसाठी मजुरीकाम करायचा. या सर्व मुलींवर बलात्कार आणि हत्या त्याने मागच्या 2 वर्षांत केली आहे.

 

काय म्हणाले पोलिस? 
मंगळवारी डीसीपी सुमीत कुमार म्हणाले की, आरोपीने चौकशीत कबूल केले की, रेपनंतर तो जुन्या गुडगावात गेला. गुरुद्वाऱ्यात लंगरमध्ये जेवण करून तो कमला नेहरू पार्कमध्ये झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे पकडून दिल्लीला गेला. 13 नोव्हेंबर रोजी दिवसभर तो दिल्लीमध्ये फिरत होता आणि रात्री निजामुद्दीन स्टेशनच्या जवळ पुलाखाली झोपला. दुसऱ्या दिवशी ट्रेनने झांशीला गेला. तेव्हापासून तेथेच भटकत होता. डीसीपी म्हणाले, 'गुरुग्राममध्ये 3, दिल्लीत 4 आणि ग्वाल्हेरात 1 व झांशीच्या 1 घटनेचा कबुलीजबाब त्याने दिले आहे. सर्व घटनांत त्याने रेपनंतर मुलींची निर्घृण हत्या केली. त्याची चौकशीकरून पुरावे गोळा केले जात आहेत. सेक्टर-39 क्राइम ब्रँचच्या टीमला 2 लाख रुपयांचे बक्षीस व प्रशस्तिपत्र देण्यात येईल.

 

पोलिसांनी सुरू केले अन्नदान, 2 हजार जणांची चौकशी
चौकशीत पोलिसांना कळले की, आरोपी रस्त्याच्या कडेला कुठेही झोपतो आणि कधी-कधी मजुरीही करतो. त्याला भंडाऱ्यात जेवणाचा छंद आहे. आणि तो नेहमीच असे करतो. यामुळे त्याला अडकवण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी गुडगावच्या एका हनुमान मंदिरात, गुरुवारी साई मंदिरात आणि शनिवारी शनि मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन केले. यादरम्यान 100 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी तब्बल 2 हजार जणांची चौकशी केली, परंतु काहीही सुगावा लागला नाही.

 

शहरात 3 मुलींना बनवले वासनेची शिकार 
आरोपीच्या चौकशीत कळले की, नोव्हेंबर 2016 आणि जानेवारी 2017 मध्ये त्याने गुडगावात 2 मुलींवर रेप करून त्यांची हत्या केली होती. नोव्हेंबर 2016 मध्ये त्याने सिव्हिल लाइन्स येथील पीर बाबा मजारमध्ये अन्नछत्रात जेवणासाठी आलेल्या मुलीचे अपहरण करून रेप केला आणि अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली. काही दिवसांनी मुलीचा मृतदेह राजीव चौकाजवळ नाल्यामधून हस्तगत करण्यात आला. यासोबतच जानेवारी 2017 मध्ये त्याने सोहना रोड शनी मंदिरावर आयोजित भंडाऱ्यामधून याच पद्धतीने एका मुलीला आपल्यासोबत नेले आणि रेपनंतर हत्या केली. मुलीचा मृतदेह त्याने ओमेक्स मॉलच्या मागे मोकळ्या जागेवर फेकून दिला. याशिवाय दिल्लीच्या 4, ग्वाल्हेर व झांशीच्या 2 प्रकरणांचा खुलासा झाला आहे. सर्व केसेसमध्ये त्याने रेपनंतर मुलींची हत्या केली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेची संंबंधित आणखी Photos...     

 

 

बातम्या आणखी आहेत...