आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुर्जर आंदोलन: रेल्वे ट्रॅकवर तंबू ठोकला..शेकोटी पेटवून बसले आहेत आंदोलक; 5 गाड्या रद्द, दिल्ली-मुंबई मार्ग ठप्प

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> मलारना-नीमोदा स्टेशनदरम्यान दिल्ली-मुंबई रेल्वे मार्ग ठप्प

> सरकारने गुर्जर समाजाच्या मागण्यासाठी 3 मंत्र्यांची कमिठी स्थापन केली, सीएम म्हणाले,  चर्चेसाठी तयार

> 13 वर्षांत 6 आंदोलन, 4 वेळा भाजप तर दोन वेळा काँग्रेसचे सरकार, 5 वेळ रेल्वे मार्ग रोखला , 72 जणांचा गेला बळी

 

जयपूर- गुर्जर समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आंदोलक रस्त्यावर नव्हे, रेल्वे ट्रॅकवर उतरले आहे. आंदोलकांनी सवाईमाधोपूरमधील मलारना आणि नीमोदा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर तंबू ठोकले आहेत. कडाक्याच्या थंडीत आंदोलक शेकोटी पेटवून बसले आहेत. परिणामी दिल्ली आणि मुंबई हा मार्गावरील धावणार्‍या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या असून एका गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे.

 

गुर्जर आंदोलकांनी रेल्वे मार्ग रोखून धरल्याने राजस्थानसह अनेक राज्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. शनिवारी 20 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

 

दिल्लीकडून येणार्‍या गाड्या बयाना येथे उभ्या..

गुर्जर आरक्षण संघर्ष समितिचे संयोजक कर्नल किरोडी सिंह बैंसला यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केले जात आहे. आंदोलकांनी कोटाली रेल्वे ट्रॅकवर तंबू ठोकला आहे. गुर्जर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने दिल्लीकडून येणार्‍या गाड्या बयाना स्टेशनवर उभ्या केल्या आहेत. सवाई माधोपूर, गंगानगरमध्येही काही गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. अवध एक्स्प्रेसला सवाई माधोपूरमध्ये थांबवली आहे.

 

बैंसला म्हणाले, मागणी पूर्ण झाल्याशिवाय आता माघार नाही..

कर्नल किरोडी सिंह बैंसला यंनी सांगितले की, गुर्जर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही. सरकारशी आता कोणतीही तडजोड केली नाही नाही. सरकारला दिलेली मूदत संपुष्टात आली आहे. सरकारी मालमत्तेचे कोणतेही नुकसान करू नये, असे आवाहन बैंसला यांनी आंदोलकांना केले आहे. सामान्य नागरिक, महिला आणि व्यापार्‍यांनाही कोणताही त्रास देऊ नये, अशा सूचनाही बैंसला यांनी आंदोलकांना केल्या आहेत.

 

सरकार चर्चेसाठी तयार..

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले की, गुर्जर आंदोलकांशी सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे.  संबंधित अधिकार्‍यांकडून याबाबत संपूर्ण आढावा घेतल्याचेही गहलोत यांनी सांगितले. यावर बैंसला यांनी म्हटले की, सरकारला चर्चेसाठी आता रेल्वे ट्रॅकवर यावे लागले.

 

तीन मंत्र्यांची कमिटी स्थापन..
गुर्जर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह, आरोग्यमंत्री रघु शर्मा आणि सामाजिक न्याय मंत्री भंवरलाल मेघवाल या तीन मंत्र्यांची कमिटी स्थापन केली आहे.

 

शनिवारी रद्द करण्यात आलेल्या गाड्या..

19020 देहरादून-बांद्रा एक्स्प्रेस
19021 बांद्रा टर्मिनस-लखनऊ एक्स्प्रेस
12415 इंदूर-नवी दिल्ली सुपारफास्ट एक्स्प्रेस
12416 नवी दिल्ली-इंदूर सुपारफास्ट एक्स्प्रेस
12909 बांद्रा-निजामुद्दीन गरीब रथ

 

शुक्रवारी 25 गाड्यांना फटका

59812 आग्रा फोर्ट-रतलाम- रद्द
54794 मथुरा-सवाई माधोपूर पॅसेंजर रद्द
12060 जनशताब्दी एक्स्प्रेस, रद्द
69155 रतलाम-मथुरा,  रद्द
59811 रतलाम-आग्रा, रद्द

बातम्या आणखी आहेत...