आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमने स्वतः एका मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर हनीमूनच्या रात्री पोहोचला तिच्या सासरी, त्याला पाहून सर्वच झाले हैराण पण त्याच्याशी बोलण्याची कोणीच करू शकले नाही हिम्मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) : बलात्कार प्रकरणी 20 वर्ष कैदेची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमला CBI विशेष न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. सीबायआयच्या विशेष न्यायालयाने गुरमीतला पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याअगोदर राम रहीमचा मुलगा जसमीत याचा मेहुणा भूपेंद्र गोराने एक आश्चर्य करणारा खुलासा केला होता. भूपेंद्रच्या मते, राम रहीमने ज्या मुलीचे लग्न लावून दिले होते, तिच्याच लग्नाच्या रात्री तिच्या सासरी गेला होता. राम रहिमला तेथे पाहून सर्वजण हैराण झाले होते. पण त्याच्याशी बोलण्याची हिम्मत कोणीही केली नाही. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून हनीप्रीत होती. तिच्यासोबत असलेले संबंधाच्या बातम्यादेखील समोर आल्या होत्या.

 

'....तर म्हणाला की, दत्तर घेतलेली मुलगी आहे.'

भूपेंद्रने सांगितले की, हनीप्रीत विश्वास गुप्ताच्या ओळखीने डेरा सच्चामध्ये दाखल झाली. तेथून तिची  राम रहिमसोबत ओळख निर्माण झाली होती. दोघांमधील जवळीक वाढल्यानंतर त्यांच्या संबंधावरून चर्चा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे राम रहिमने 2009 मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करून हनीप्रीत त्याची दत्तक घेतलेली मुलगी असल्याचे घोषित केले. यानंतर 14 फेब्रुवारी 1999 रोजी विश्वास गुप्तासोबत तिचे लग्न लावून दिले. पण त्यांना हनीमून साजरा करू दिला नाही. लग्नाच्या पहिल्याच रात्री तो स्वतः हनीप्रीतच्या सासरी गेला आणि तेथून तिला डेरामध्ये घेऊन आला. यानंतर हनीप्रीतने विश्वास गुप्ताला सोडून दिले. 

 

कोण आहे हनीप्रीत?

हनीप्रीतचे खरे नाव प्रियांका तनेजा आहे. तिचे वडील रामानंद तनेजा आणि आई आशा तनेजा फतेहाबाद येथील रहिवाशी आहे. रामानंद देखील राम रहीमचे अनुयायी होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती विकून डेरा सच्चा सौदामध्ये दुकान चालवत होते. हनीप्रीतने राम रहीमच्या प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या चित्रपटांमध्ये अभिनय तसेच दिग्दर्शन केले आहे. ती सावलीप्रमाणे राम रहीमसोबत राहत होती.  हनीप्रीतच्या पूर्व पतीने (Ex-husband)हनीप्रीत आणि राम रहीम यांच्यात अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता. हनीप्रीतवर गेल्या वर्षी राम रहीमला दोषी सिद्ध केल्यानंतर पंचकुलामध्ये दंगे भडकवण्याचा आरोप आहे. सध्या ती अंबाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...