आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमेहर कौर पुन्हा एकदा चर्चेत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुरिमा टीम,

गुरमेहर कौरचे आता ‘द यंग एंड द रेस्टलेस : यूथ एंड पॉलिटिक्स इन इंडिया' या नावाचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. आपल्या नव्या पुस्तकातून गुरमेहरने विद्यार्थी आंदोलनातून पुढे येणाऱ्या नेतृत्वांचा राजकीय प्रवास तसेच विद्यार्थिदशेत असताना प्रश्न उपस्थित केल्यामुळे चर्चेत राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनातील युवक-युवतींचा प्रवास मांडला आहे.


साल २०१७... गुरमेहर कौर या तरुणीने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला होता, ज्यात तिने तिच्या हातात कारगिलमध्ये शहिद झालेल्या आपल्या वडिलांचा कॅप्टन मंदीप सिंह यांचा फोटो धरला होता आणि त्यावरचा मथळा होता, "माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले होते.' यावरून गुरमेहर प्रचंड ट्रोल झाली होती आणि अनेकांनी तिला देशद्रोही ठरवले होते. 

याच गुरमेहरचे आता "द यंग एंड द रेस्टलेस : यूथ एंड पॉलिटिक्स इन इंडिया' या नावाचे  नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. यापूर्वीही तिने एक पुस्तक लिहिले होते. आपल्या नव्या पुस्तकातून गुरमेहरने विद्यार्थी आंदोलनातून पुढे येणाऱ्या नेतृत्वांचा राजकीय प्रवास तसेच विद्यार्थिदशेत असताना प्रश्न उपस्थित केल्यामुळे चर्चेत राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनातील युवक-युवतींचा प्रवास मांडला आहे.

काश्मीरची परिस्थिती, भारतीय शिक्षण व्यवस्था, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, जाती-धर्मासंबंधित समस्या अशा प्रश्नांकडे गुरमेहर वेगळ्या पद्धतीने पाहते. ज्या राजकीय नेत्यांनी अशा परिस्थितींवर काहीही भूमिका घेतलेली नाही किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते त्याला सहमती दर्शवतात अशांच्या विरोधात तिने लिहिले आहे. देशाची राजकीय परिस्थिती आणि बदलते राजकारण हा तिच्या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. ज्यांनी भारताच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत अशा युवा नेत्यांच्या मुलाखती  गुरमेहरने  या पुस्तकात घेतल्या आहेत. भारतात युवा नेत्यांची कमतरता आहे असे मांडून पुस्तकाच्या प्रारंभीच गुरमेहर स्पष्ट करते की, भारताची ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ पेक्षा कमी वयोगटातील लोकांची आहे, तरीही लोकसभेत फक्त १२ टक्के सदस्यच ४० वर्षांच्या आतले आहेत. त्यामुळे भारतात युवा नेत्यांची गरज आहे. या पुस्तकात फक्त त्या लोकांचा राजकीय प्रवास आहे, जे राजकारणात वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आले आहेत.  राजकारणात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारे पुस्तक आहे. 

बातम्या आणखी आहेत...