आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवार 23 नोव्हेंबर 2018 रोजी कार्तिक पौर्णिमा आहे. शीख समुदायासाठी हा अत्यंत खास दिवस मानला जातो. कारण याच दिवशी शिखांचे प्रथम गुरु नानकदेवजी यांची जयंती प्रकाश उत्सव रूपात साजरी केली जाते. या दिवशी गुरुद्वारांमध्ये गुरुवाणीचे पाठ केले जातात तसेच ठिकठिकाणी लंगरचे आयोजन केले जाते.
जाणून घ्या, गुरुनानक यांच्याविषयी...
इ.स. 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री नानकदेवजी यांचा जन्म तलवंडी (पाकिस्तान) मध्ये झाला. त्यांचे वडील श्री कल्याणचंदजी तलवंडी गावचे पटवारी होते. सध्या या गावात नानकांना साहिब म्हणून ओळखले जाते. प्रेमळ, सहिष्णू स्वभावाचे श्री कल्याणचंदजी आणि माता तृप्ता यांच्या पोटी श्री गुरू नानकदेवजी यांचा जन्म झाला.
लहानपणापासून त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा आणि विश्लेषण करण्याच्या क्षमतेचा प्रत्यय येत असे. त्यांच्या घरी येणाऱ्या विद्वान पंडित आणि मौलाना यांच्याशी ते धार्मिक चर्चा करीत. लहान वयात ज्येष्ठ धर्मगुरूंशी धार्मिक वादविवादात नमवल्यामुळे श्री नानकदेवजींची कीर्ती लवकरच पसरू लागली. शीख संप्रदायाचे पहिले गुरू असलेले श्री गुरू नानकदेवजी यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्यामुळे त्यांनी अनुयायांचा प्रचंड गोतावळा गोळा केला. सध्या शीख धर्माचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे जयंती जगभर कार्तिकी पौर्णिमेला साजरी केली जाते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शीख धर्माचे दहा सिद्धांत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.