आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gurugram Bodyguard Arrested For Attempting Sexual Assault On Doctors Wife In A Lift

डॉक्टरच्या पत्नीवर होती बॉडीगार्डची वाइट नजर; Lift पकडून केले असे काही, जीवे मारण्याच्याही दिल्या धमक्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीला अगदी लागून असलेल्या गुरुग्रामच्या एका सोसायटीत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका बिझनेसमनच्या बॉडीगार्डने 22 वर्षीय विवाहितेसोबत लिफ्टमध्ये अश्लील वर्तन केले. लिफ्टमध्ये एकटी सापडल्यानंतर तिच्यावर बळजबरी करत छेड काढली. पीडित महिलेचा पती डॉक्टर असून त्यांचे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर फ्लॅट आहे. तर त्याच इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या फ्लॅटमध्ये आरोपी बॉडीगार्ड भाड्याने राहतो. 


असे आहे संपूर्ण प्रकरण
- गुरुग्रामच्या एमजी रोडवर एका पॉश कॉलनीत पीडित महिला आपल्या डॉक्टर परिसरात राहते. त्याच इमारतीमध्ये एक बॉडीगार्ड खालच्या फ्लोअरवर असलेल्या एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी बॉडीगार्ड राकेश कुमार महिलेचा पाठलाग करत होता. घरातून बाहेर पडताच तो तिची छेड काढण्याचा प्रयत्न करायचा. परंतु, भीमकाय शरीरयष्टी आणि हातात नेहमी रिव्हॉल्वर असल्याने ती महिला राकेशला घाबरत होती. 
- त्याचाच गैरफायदा घेत बॉडीगार्डची हिंमत दिवसेंदिवस वाढत गेली. तो आता कुठल्याही बहाण्याने डॉक्टरच्या पत्नीला टच करण्याचा प्रयत्न करायचा. याच आठवड्यात मंगळवारी त्याने महिलेला इमारतीमध्ये येत असताना पाहिले. तिच्यासोबत कुणीच नसल्याने तो मागे तिच्यासोबत लिफ्टमध्ये चढला. 
- लिफ्ट बंद होताच त्याने महिलेची छेड काढण्यास आणि तिच्यावर बळजबरी करण्यास सुरुवात केली. विरोध केला असता तिला बंदूक दाखवली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मोठ्या मुश्किलीने ती चौथ्या मजल्यावर पोहोचली तेव्हा तिने मदतीसाठी अलार्म वाजवला. 
- पोलिसांनी आरोपी राकेश कुमारला अटक केली असून त्याच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश कुमार मूळचा झज्जर जिल्ह्यातील रहिवासी असून तो एका उद्योजकाचा खासगी अंगरक्षक होता. पोलिसांनी त्याची परवानाधारक बंदूक सुद्धा जप्त केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...