आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gurugram Female Employee Went To Seventh Floor To Threaten Suicide After Being Sacked, Video Goes Viral

नोकरीवरून काढल्याने ऑफिसच्या 7 व्या मजल्यावर चढली तरुणी, व्हिडिओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - येथील सेक्टर 18 मध्ये असलेल्या एका खासगी ऑफिसच्या छतावरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी कंपनीच्या 7 व्या मजल्यावर जाऊन चढली. बॉसने नोकरीवरून काढलेच कसे याचा तिला राग होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, त्यावर ती इतकी चिडली की छतावर जाऊन उडी मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. ही तरुणी छताच्या गॅलरीवर अगदी कोपऱ्यावर थांबली होती. आयुष्य आणि मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर होते. तिची समजूत काढण्यासाठी काही सहकारी सुद्धा छतावर पोहोचले. अतिरिक्त मदतीसाठी पोलिसांना देखील बोलावण्यात आले. या संपूर्ण घटनेचा काहींनी व्हिडिओ बनवला आहे.


उतर बाई, नोकरीवरून काढणार नाही...
कंपनीच्या सहकाऱ्यांनी लाख समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. पोलिसांच्या विनंतीला सुद्धा तिने झुगारून लावले. यानंतर अखेर तिच्या कंपनीतील बॉसला छतावर यावे लागले. त्याने तिला नोकरीवरून काढणार नाही असे आश्वासन दिले. यानंतर अखेर ती खाली उतरली. हा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी गुरुग्रामच्या एका कंपनीत टिपण्यात आला. तेव्हापासून फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करण्यात आली नाही.