Home | Jeevan Mantra | Dharm | Guruwar che Upay in marathi

श्रावण : दुर्भाग्यापासून दूर राहण्यासाठी गुरुवारी करा या 9 पैकी कोणताही एक उपाय

रिलिजन डेस्क | Update - Aug 23, 2018, 12:01 AM IST

कुंडलीमध्ये गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास लग्न आणि भाग्य बाधेला सामोरे जावे लागू शकते.

 • Guruwar che Upay in marathi

  कुंडलीमध्ये गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास लग्न आणि भाग्य बाधेला सामोरे जावे लागू शकते. गुरु ग्रहाच्या दोष शांतीसाठी श्रावण मासातील गुरुवारी खास उपाय केले जाऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गुरु ग्रहाला बृहस्पती असेही म्हटले जाते. हे देवतांचे गुरु आहेत. गुरु ग्रह वैवाहिक जीवन आणि भाग्य कारक ग्रह आहे. गुरु ग्रहाची पूजा शिवलिंग रूपातही केली जाते. येथे जाणून घ्या, गुरु ग्रहाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...


  1. गुरु बृहस्पती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो पिवळ्या कपड्यावर विराजित करून पूजा करा. पूजेमध्ये चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फुल आणि प्रसादासाठी पिवळे व्यंजन किंवा फळ अर्पण करावे.


  2. गुरुवारी गुरु ग्रहाची व्रत ठेवावे. या दिवशी पिवळे वस्त्र धारण करावेत. मीठ न टाकलेले अन्न खावे. जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदा. बेसनाचे लाडू, केळी असावी.


  3. या गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने गुरु ग्रहाचे दोष दूर होतात.


  4. गुरु मंत्राचा जप करावा - मंत्र- ऊँ बृं बृहस्पते नम:I मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी.


  5. गुरूशी संबंधित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळ्या वस्तू उदा. सोने, हळद, हरभरा डाळ, आंबा (फळ) इ.


  6. गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर भगवान विष्णुसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत.


  7. गुरुवारी संध्याकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावावा. पूजा करून मिठाई अर्पण करावी.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Guruwar che Upay in marathi

  8. गुरुवारी विशेष पूजेनंतर स्वतःच्या कपाळावर केशराचा टिळा लावावा. केशर नसल्यास हळदीचा टिळा लावू शकता. 

 • Guruwar che Upay in marathi

  9. गुरुवारी आई-वडील आणि गुरुचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.

Trending