आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधी काॅलनीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला, मुद्देमाल जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी कविता कुकरेजा यांच्या घरातून १ लाख २३ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. बाजारपेठ पाेलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजता ही कारवाई केली. याप्रकरणी विशाल उत्तमचंद आहुजा याला अटक करण्यात आली आहे. 

 

सिंधी काॅलनीतील कविता कुकरेजा यांच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती बाजारपेठ पाेलिसांना मिळाली. यानंतर डीवायएसपी गजानन राठोड व पाेलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहायक फाैजदार अंबादास पाथरवट, हवालदार छोटू वैद्य, बाळकृष्ण पाटील, सुनील थोरात, दीपक जाधव, समाधान पाटील, सचिन चौधरी, कृष्णा देशमुख, संदीप परदेशी, विनोद वितकर, बंटी कापडणे यांनी कुकरेजा यांच्या घरात छापा टाकला. तेथे त्यांना महाराष्ट्रात विक्रीवर बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा आढळला. अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी हा साठा जप्त करत अनिल गुजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. 

बातम्या आणखी आहेत...