Home | National | Madhya Pradesh | Gwalior congress leader Attempt suicide

पक्षाने उमेदवारी न दिल्याने 'या' काँग्रेस नेत्याने माधवराव सिंधियांच्या प्रतिमेसमोरच प्राशन केले विष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 07:52 PM IST

कुशवाह यांच्यावर जयारोग्य हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात उपचार आहे.

  • Gwalior congress leader Attempt suicide

    ग्वाल्हेर- उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाल्याने काँग्रेसच्या एका नेत्याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रत्यन केला. प्रेमशंकर कुशवाह असे या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. कुशवाह हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते.

    मिळालेली माहिती अशी की, प्रेमशंकर कुशवाह यांनी माधवराव सिंधिया यांच्या प्रतिमेसमोरच विषप्राशन केले. कुशवाह सध्या प्रदेश काँग्रेस कमेटीचे सदस्य आहे. कुशवाह यांच्यावर जयारोग्य हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात उपचार आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये कुशवाह यांना पाहाण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एकच गर्दी केली होती.

    प्रेमसिंह कुशवाह यांनी ग्वाल्हेर दक्षिण किंवा ग्वाल्हेर पूर्व विधानसभा मतदार संघात उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या ऐवजी ग्वाल्हेर दक्षिणमधून सुरेश पचौरींचे समर्थक प्रवीण पाठक यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आली. कुशवाह यांचा अंतीम प्रयत्न अयशस्वी ठरला. प्रवीण यांच्या नावाची घोषणा होताच कुशवाह यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध केला होता.

    कुशवाह यांनी आपल्या समर्थकांसोबत जयविलास पॅलेससमोर आंदोलन केले होते. पक्ष शेवटच्या क्षणी आपल्याला उमेदवारी देईल, अशी अपेक्षा कुशवाह यांनी होती परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेली तरी पक्षाने त्यांचा विचार केला नाही. अखेर कुशवाह यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Trending