आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाने आत्महत्येसाठी गाठला मॉल, 15 मिनिटे तिसऱ्या मजल्यावर फिरला, भिंतीवर मार्करने लिहिले- आय लव्ह यू जान.. मग 42 फूट उंचीवरून मारली उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर (म. प्र.) - मुरैनाचा रहिवासी असलेल्या बीएडच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी फूलबागेतील दीनदयाल (डीडी) मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तो शुक्रवारी सकाळी 9.30 वाजताच आपल्या घरातून न सांगता ग्वाल्हेरात आला होता. आत्महत्येच्या पूर्ण तयारीने आलेला हा विद्यार्थी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर 15 मिनिटे भटकत राहिला, मग खिशातून मार्कर पेन काढून मॉलच्या भिंतीवर त्याने आय लव्ह यू जान.. लिहिले. यानंतर रेलिंगमधून पाय बाहेर काढून उडी मारली.

 

42 फूट उंचीवरून हा विद्यार्थी ग्राउंड फ्लोअरवर कोसळला
42 फूट उंचीवरून या विद्यार्थ्याने उडी मारली. मॉलमधील दुकानदार आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले, परंतु त्याचा जीव वाचवता आला नाही. मृत्यूआधी त्याने एक सुसाइड नोटही लिहिली होती. जी त्याच्या खिशातून आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये आजीला मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे. प्राथमिकदृष्ट्या या आत्महत्येमागे प्रेमप्रकरणच कारण वाटत आहे. पूर्ण कहाणी कुटुंबीयांच्या जबाबानंतर स्पष्ट होईल. सध्या इंदरगंज पोलिसांनी मृतदेहाचे डॉक्टरांमार्फत पोस्टमॉर्टम करून सुसाइड नोट आणि मोबाइल ताब्यात घेतला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

 

भिंतीवर मार्करने लिहिले आय लव्ह यू अन् मारली उडी

मुरैनाच्या केशव कॉलनीतील रहिवासी सुभाष वर्मा हे दुकान चालवतात. त्याचा मुलगा शिवम (22) बीएड करत होता. सुभाष यांचे काका एमएल वर्मा यांची टिनी कॉन्व्हेंट नावाची शाळा आहे. तेथे शिवम शिकवत होता. दुपारी ट्यूशनही घेत होता. यातून त्याचा खर्च भागत होता. 3 दिवसांपासून त्याची तब्येत थोडी बिघडली होती. शुक्रवारी सकाळी तो शाळेत गेला, यानंतर तो 9 वाजता शाळेतून घरी परत आला. मग घरातून शाळेसाठी जात असल्याचे सांगून निघाला. परंतु शाळेत पोहोचलाच नाही. शाळेऐवजी तो ग्वाल्हेरात गेला, परंतु कुटुंबीयांना काहीही माहिती नव्हती. दुपारी 12.15 वाजता डीडी मॉलमध्ये गेला. तिसऱ्या मजल्यावर तो भटकत होता. यानंतर एका कोपऱ्यात भिंतीवर मार्करने आय लव्ह यू लिहिले. आणि मग त्याने उडी मारली. तो खाली कोसळताच खळबळ उडाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु सव्वा तासाने डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...