आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तांत्रिक विद्यापीठामध्ये मिळते तंत्र-मंत्रची डिग्री, नवरात्रीमध्ये केल्या जातात खास तंत्र क्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वालियर : जवळपास 1200 वर्षांपूर्वी बांधलेल्या या तांत्रिक विद्यापीठामध्ये तंत्र-मंत्राचे शिक्षण दिले जात होते. तंत्र-मंत्राची डिग्री घेण्यासाठी येथे विविध देशातील विद्यार्थी येत होते. याला चौंसष्ट योगिनी मंदिर असेही म्हटले जात होते. भारतामध्ये चार चौंसष्ट योगिनी मंदिर आहेत. यामधील 2 ओडिशात आणि दोन मध्य प्रदेशमध्ये आहेत. मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये येथे तंत्र-मंत्र क्रिया केल्याने सिद्धी प्राप्त होते.


- नवरात्र सुरु होताच या चौंसष्ट योगिनी मंदिरात अनेक तांत्रिक जमा होतात. याठिकाणी तांत्रिक रात्रभर अनुष्ठान करतात. या मंदिरात केवळ भारतीयच नाही तर तांत्रिक क्रियांवर विश्वास ठेवणारे विदेशी नागरिकही पूजा करतात.


- हे मंदिर कधीकाळी तांत्रिक अनुष्ठानांसाठी ओळखले जात होते. यामुळे याला तांत्रिक विद्यापीठ म्हटले गेले आहे.


- 1200 वर्षांपूर्वी प्रतिहार वंशाच्या राजांनी बांधलेल्या या मंदिरात 101 खांब आणि 64 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे.


- मंदिराच्या मुख्य परिसरात एक शिवलिंग आहे. मंदिराच्या प्रत्येक खोलीमध्ये

शिवलिंगासोबतच देवी योगिनीची मूर्ती होती परंतु सुरक्षेच्या कारणावरून या मूर्ती आता दिल्लीतील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...