आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये व्यायामासोबतच या 5 गोष्टींकडे लक्ष देणेही आवश्यक, होईल फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिममध्ये भरपूर व्यायाम केल्यानंतरही शरीरावर त्याचा काहीच परिणाम होत नसेल तर याचा अर्थ आहे तुम्हाला व्यायामाचा पुरेपूर फायदा मिळत नाही. नेहमीच लोकांना असा भ्रम होतो की, जिममध्ये व्यायाम करणे फिटनेससाठी पुरेसे आहे. तथापि, फिट राहण्यासाठी व्यायामासोबतच या ५ गोष्टींकडे लक्ष देणेही तितकेच आवश्यक ठरते. 


स्ट्रेचिंग - भरपूर व्यायाम केल्यानंतर स्ट्रेच न केल्याने शरीराच्या हालचालींमध्ये खूप घट होते आणि इजा होण्याची शक्यता वाढते. व्यायाम केल्यानंतरही स्नायू लवचिकच राहत असतील तर त्यासाठी ८ ते १० मिनटे स्ट्रेचिंग अवश्य करावी. 


चांगली झोप - झोपताना आपले शरीर स्वत:ला रिकव्हर करते. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण दिवस शरीरामध्ये थकवा जाणवतो. 


बॉडी पोश्चर - तासभर एकाच पोश्चरमध्ये बसून काम केल्याने शरीराचा आकार बिघडायला लागतो. त्यासाठी आसनावर बसल्या बसल्याच दर तासाला कमीत कमी ५० सेकंदांसाठी शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे. यामुळे रक्तप्रवाहही सुरळीत राहतो आणि बॉडी पोश्चरही.

बातम्या आणखी आहेत...