आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"स्टेरॉइड’बाबत जिमची सहा महिन्यांत तपासणी; अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणेंची विधानसभेत माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ऑनलाइन औषध विक्रीबाबत केंद्र सरकार लवकरच कायदा आणणार आहे'

मुंबई- व्यायामशाळेत येणाऱ्यांना त्वरित आपले शरीर सुडौल व्हावे म्हणून स्टेरॉईड दिले जात असल्याचा आरोप विधानसभा सदस्यांनी केल्यानंतर, राज्यभरातील व्यायामशाळांची सहा महिन्यात तपासणी करून यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

कल्याणमध्ये एका तरुणीचा तर मुंब्य्रामध्ये एका तरुणाचा स्टेरॉईडच्या काही गोळ्या घेतल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अमित साटम, आशिष शेलार आदी सदस्यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित करून, सरकार अनधिकृतरित्या स्टेरॉईडची विक्री करीत असलेल्या व्यायामशाळांबाबत काय भूमिका घेणार आणि या मृत्यूची चौकशी कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अशा औषधांमुळे तरुणांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून अशी औषधे ऑफलाईन आणि ऑनलाईन विकण्यास बंदी घालावी आणि याच्या विक्रीवर याच अधिवेशनात कायदा करावा, अशी मागणीही या वेळी सदस्यांनी केली.


लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले, ऑनलाइन औषध विक्रीबाबत राज्याचा कायदा नसून याबाबत केंद्र सरकार लवकरच कायदा आणणार आहे. केंद्र सरकारचा कायदा आल्यानंतर त्याचा अभ्यास करून राज्याला आवश्यक वाटल्यास त्यात आणखी सुधारणा करून वेगळा कायदा करण्याबाबत विचार करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची चौकशी करण्यासाठी आणखी कोणता गुन्हा दाखल करता येईल याबाबत गृहमंत्र्यांकडूनही माहिती घेतली जाईल, असे उत्तर राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...