आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन भारती सिंह करतेय आई होण्याची तयारी, म्हणाली - मी प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत करत राहणार कॉमेडी, स्टेजवर बेबी बंपसोबत दिसणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कॉमेडियन भारती सिंह म्हणते की, ती आणि हसबंड हर्ष लिम्बचिया पुढच्या वर्षी बेबी प्लान करणार आहेत. एका एन्टटेन्मेंट पोर्टलसोबत बोलताना भारतीने हा खुलासा केला. भारती म्हणाली, "आम्ही ठरवले आहे की, 2019 मध्ये आम्ही बेबी प्लान करु आणि आपले नाते पुढच्या लेव्हलला घेऊन जाऊ." 3 डिसेंबर 2017 मध्ये तिने गोव्यात लग्न केले होते. ती म्हणते की, मदरहुडविषयी मी खुप गंभीर आहे. 

 

भारती म्हणाली - प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसापर्यंत करणार काम 
- बोलताना भारती म्हणाली की, "मी मदरहुडविषयी खुप गंभीर आहे. मी माझ्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत काम करत राहिल. स्वतःला बेबी बंपसोबत स्टेजव इमॅजिन करते."
- भारतीने आतापर्यंत बेबीप्लान का केला नाही याविषयी तिने सांगितले. ती म्हणाली - "चॅनलची गर्ल म्हणते की, हर्ष आता बेबी नको, काम कर. रात्री 1-1 वाजता घरी आला तर बेबी कसा होईल?" यावर उत्तर देत हर्ष म्हणाला, "काही हरकत नाही, एक दिवस 9 वाजता येईल." भारती आणि हर्ष लवकरच  'खतरों के खिलाड़ी' आणि 'द कपिल शर्मा शो' च्या नवीन सीजनमध्ये दिसणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...