आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hackers Giving 6 Missed Calls To Businessman Transfer Rs 1 86 Crore From Bank Account

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री उशीरा मोबाइलवर आले 6 मिस्ड कॉल्स आणि व्यापार्‍याच्या बॅंक खात्यावरून गायब झाले पावणे दोन कोटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माहीम येथील एका व्यापार्‍याला ऑनलाइन हॅकर्सनी मोठा चूना लावला आहे. रात्री उशीरा मोबाइलवर मिस्ड कॉल्सच्या माध्यमातून व्ही शाह नामक व्यापार्‍याला हॅकर्स 1 कोटी 86 लाख रुपयांना गंडा घातला आहे. व्यापार्‍याच्या बॅंक खात्यातून एवढी मोठी रक्कम एका झटक्यात गायब झाली.

 

'मुंबई मिरर'मध्ये ‍प्रसिद्‍ध झालेल्या वृत्तानुसार, 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री शाह यांच्या मोबाईलवर 6 मिस्ड कॉल आले. नंतर त्यांच्या मोबाईलमधी सिम कार्ड डिअॅक्टिवेट झाले. हॅकर्सनी व्यापार्‍याच्या नावाने नवे सिमकार्ड घेऊन देशभरातील 14 बॅंक खात्यावर पैसा ट्रान्सफर करून घेतला.

 

रिपोर्टनुसार, व्यापार्‍याला दोन क्रमांकावरून मिस्ड कॉल आले होते. त्यापैकी एकाचा कोड +44 होता. यूनाइटेड किंगडमचा हा कोड आहे. सकाळी उठून व्यापार्‍याने त्या क्रमांकावर कॉल केला असता सिम डिअॅक्टिवेट झाल्याचे समोर आले. मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरकडे तक्रार केली असता व्यापार्‍याच्या नावाने न्यू सिमची रिक्वेस्ट आली होती. नंतर त्यांचे जुने सिम डिअॅक्टिवेट केल्याचे समजले. परंतु व्यापार्‍याने न्यू सिमसाठी कोणतीही रिक्वेस्ट दिली नव्हती. आपपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यापनंतर व्यापार्‍याने बॅंकेत जाऊन चौकशी केली असता त्याच्या कंपनीच्या खात्यातून 1 लाख 86 हजार रुपये देशभरातील 14 खात्यांवर ट्रान्सफर झाल्याचे समोर आले.

 

28 ट्रान्झेक्शनद्वार देशभरातील 14 खात्यांवर ट्रान्सफर झाला पैसा..
बॅंक अधिकार्‍याने दिलेली माहिती अशी की, व्यापारी व्ही शाह यांच्या कंपनीच्या बॅंक खात्यातून 28 ट्रान्झेक्शनद्वारा देशभरातील 14 खात्यांवर 1 कोटी 86 लाख रुपये ट्रान्सफर झाले.  शाह यांच्या खात्यावर 20 लाख रुपये शिल्लक होते.

 

शाह यांनी मीडियाला सांगितले की, माझ्या कंपनीचे बॅंक खाते मोबाईल फोनशी लिंक होते. परंतु मिस्ड कॉलच्या माध्यमातून माझ्या बॅंक खात्यातून झटपट एवढी मोठी रक्कम गायब होईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते.