आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hackers Threaten To Reveal Secret Data Linked To 9 11 Attacks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅकर्सने दिली 9/11 हल्ल्याचे गुपित समोर आणण्याची धमकी, सर्वात मोठ्या विमा कंपन्यांना मागितली खंडणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - एका हॅकर ग्रुपने जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 9/11 चे गुपित जगासमोर आणण्याची धमकी दिली आहे. हॅकिंग ग्रुपने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या हातात या हल्ल्याशी संबंधित अतिशय गुप्त अशा कागदपत्रांच्या फायली लागल्याचा आहेत. या फायली सार्वजनिक झाल्यास 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्याचे खरे सत्य जगासमोर येईल. द डार्क ओव्हरलोड असे या ग्रुपचे नाव असून त्यांनी ज्या कंपनीच्या फाईल हॅक केल्या, त्यांनी सुद्धा या हॅकिंगसंदर्भात अधिकृत दुजोरा दिला आहे. अशात हे सत्य आहे तरी काय असा प्रश्न लोकांना पडला आहे.


या कंपन्यांना धमकी...
पेस्टबिनवर हॅकिंग ग्रुपने आपली धमकी पोस्ट केली आहे. मदरबोर्डच्या वृत्तानुसार, डार्क ओव्हरलोडने हिसकोक्स सिंडीकेट्स लिमिटेड, लॉएड ऑफ लंडन आणि सिल्वर्सटीन प्रॉपर्टीस अशा जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांची त्यांनी नावे घेतली आहेत. "या कंपन्या पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या विमा कंपन्या आहेत. अगदी पिनपासून प्लेनपर्यंत या पृथ्वीवरील जवळपास सर्वच गोष्टींचा विमा या कंपन्यांनी उतरवला आहे. त्यामध्ये गगनचुंबी इमारती उदाहणार्थ वर्ल्ड ट्रेड सेंटर्सचा देखील समावेश होता." असे या समूहाने म्हटले आहे.


बिटकॉइनमध्ये मागितली खंडणी
हॅकर्सने डेटा गुप्त ठेवण्याच्या बदल्यात बिटकॉइनच्या स्वरुपात खंडणी मागितली आहे. ती रक्कम किती आहे हे हॅकर्सने जाहीर केले नाही. कंपन्यांना यासंदर्भात कळवण्यात आले असे त्यांनी स्पष्ट केले. या सायबर हल्लेखोरांनी नेमक्या कोणत्या फायली हॅक केल्या किंवा त्यामध्ये नेमके काय याबद्दल काहीही समोर आले नाही. पण, लवकरच सर्वांना याची उत्तरे मिळतील असे सायबर हल्लेखोरांनी स्पष्ट केले. 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेवर हल्ला झाला तेव्हापासूनच यात अंतर्गत कट होता असे दावे करणारे कॉन्सपिरेसी थ्योरिस्ट करत असतात. अशात या हॅकिंगच्या घटनेवरून ते आणखी सक्रीय झाले आहेत.


कंपनीने दिला दुजोरा...
हिसकोक्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी मदरबोर्डशी संवाद साधताना आपल्या कंपनीसाठी काम करणाऱ्या एका वकिलाती संस्थेची हॅकिंग झाली असा अधिकृत दुजोरा दिला. सोबतच, ज्या संस्थेच्या फायली चोरण्यात आल्या त्यांनी एकेकाळी वर्ल्ड ट्रेड सेंटरचा विमा उतरवताना हिकोक्सला सल्ला दिला होता अशी कबुली दिली. सोबतच, त्या फायली हल्ल्याशी संबंधित असतील का याची शक्यता सुद्धा त्यांनी नकारलेली नाही.


कागदपत्रांची झलक दाखवली...
हॅकिंग ग्रुपने संक्षेपात हॅक केलेल्या कागदपत्रांतील मजकूराची झलक दाखवली आहे. विमा कंपन्यांनी वकिलाती कंपन्या, सरकारी संस्था, संरक्षण संस्था, विमान कंपन्या आणि इतर संस्थांशी कोणते संवाद साधले आणि काय ई-मेल केले याचा संपूर्ण लेखा-जोखा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. खंडणी मिळाली नाही तर लवकरच अधिक माहिती जारी करण्यात येईल असे हॅकर्सने धमकावले आहे.