आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी खरंच म्हणाले, सत्तेत येण्यासाठी खोटी आश्वासने दिली? पाहा राहुल गांधींनी शेअर केलेला हा Video, सगळ्यांनाच बसेल धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कार्यक्रमात नाना पाटेकर हेही गडकरींसह सहभागी झाले होेते. - Divya Marathi
या कार्यक्रमात नाना पाटेकर हेही गडकरींसह सहभागी झाले होेते.

नवी दिल्ली - राजकारणी अनेक आश्वासने देत असतात. ती आश्वासने पूर्ण होतातच असे नाही. पण राजकारणी मात्र आपलेच खरे करण्यात पुढे असतात. आपण सांगितलेले सर्व कसे योग्य दिशेने राबवत आहोत, हेच ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. कोणताही राजकारणी कधीही आपण खोटी आश्वासने दिली होती असे सांगत नाही. पण गडकरी मात्र एका शोमध्ये असेच काहीतरी बोलून बसले आहेत. एका वाहिनीवरील चॅट शोमध्ये बोलताना गडकरी सहज बोलून गेले की, आम्हाला कधीच वाटले नव्हते की आमची सत्ता येईल, त्यामुळे आम्ही आश्वासने देत गेलो, असे गडकरी या शोमध्ये म्हणाले. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. 


गडकरी असे नेमके कोणत्या दृष्टीकोनातून बोलले किंवा त्यामागचे कारण काय हे त्यांनाच माहिती. पण गडकरी नेमके यावेळी काय काय म्हणाले हे शब्दांत सांगण्याऐवजी तुम्ही त्यांचा प्रत्यक्ष व्हिडिओच पाहा ना... राहुल गांधींनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे..

सही फ़रमाया, जनता भी यही सोचती है कि सरकार ने लोगों के सपनों और उनके भरोसे को अपने लोभ का शिकार बनाया है| pic.twitter.com/zhlKTrKHgU

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2018

 

 

 

बातम्या आणखी आहेत...