BREAKING NEWS / 26/11 हल्ला / मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला लाहोर येथून अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिजवर लागले हे आरोप

वृत्तसंस्था

Jul 17,2019 01:10:46 PM IST

इस्लामाबाद - जगातील सर्वात कुख्यात दहशतवाद्यांपैकी एक आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या लाहोर येथील गुजरानवाला येथे जात असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, हाफिजला बुधवारी अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर हाफिजची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिजला अटक म्हणजे, पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर केवळ ढोंग असेही म्हटले जात आहे.

भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दहशतवादविरोधी कारवायांसाठी वाढता दबाव पाहता पाकिस्तानने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, हाफिजला यापूर्वीही अटक झाली होती. परंतु, काही वेळातच त्याची सुटका करण्यात आली. यानंतर पाकिस्तानने त्याला नजरकैदेत ठेवण्याचे ढोंग सुद्धा केले होते. त्यातही पाकिस्तानी सरकारने हाफिज सईदला 2008 च्या मुंबई हल्ल्यांसाठी अटक केलेली नाही. लश्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा आणि इतर कुख्यात दहशतवादी संघटनांचा संस्थापक हाफिजवर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप केले आहेत. गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या एका न्यायालयाने हाफिजसह त्याच्या इतर 3 सहकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यातच बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

X
COMMENT