आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेरर फंडिंगच्या आणखी एका प्रकरणात हाफिज सईद दोषी, आरोप स्विकारण्यास सईदचा नकार

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सईद आणि आणखी एकाने एफआयआरमधील आरोप स्वीकारण्यास नकार दिला

इस्लामाबाद- जमात-उद-दावाचा (जेयूडी) म्होरक्या हाफिज सईदला टेरर फंडिंगच्या आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.‘द न्यूज’ने शनिवारी सांगितले की, जमात-उद-दावाच्या नेतृत्वावर दहशतवादी कारवायांना निधी पुरवणे आणि मनी लाँडरिंगशी संबंधित २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते पाच शहरांत दाखल आहेत. सुरक्षेमुळे लाहोरच्या दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयात (एटीसी) सर्व खटले दाखल करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी एटीसी न्यायाधीशांच्या समोर हाफिज सईद आणि आणखी एकाला सीटीडी गुजरांवालातर्फे दाखल केलेल्या एका एफआयआरच्या कार्यवाही प्रकरणात हजर केले. सईद आणि आणखी एकाने एफआयआरमधील आरोप स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने जेयूडीच्या सदस्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले. ३ डिसेंबरला जेयूडीच्या १३ वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात दहशतवाद प्रतिबंधक अधिनियम (एटीटी) १९९७ अंतर्गत २५ वर गुन्हे नोंदवण्यात आले होते. दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (सीटीडी) पंजाबच्या पाच शहरांत गुन्हे दाखल केले. गैरलाभकारी संघटना आणि अल-अनफाल ट्रस्ट, दावातुल अरशाद ट्रस्ट, मुआज बिन जबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीतून जेयूडी दहशतवादाला निधीचा पुरवठा करत होती, अशी घोषणा सीटीडीने केली होती. या गैरलाभकारी संघटनांवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आली. नंतर १७ जुलैला पंजाब सीटीडीद्वारे दहशतवादाला निधीचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून हाफिज सईदला गुजरांवाला येथून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. जेयूडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या व्यतिरिक्त मलिक जफर इक्बाल, आमिर हमजा, मोहम्मद याह्या अजीज, मोहम्मद नईम, मोहसीन बिलाल, अब्दुल रकीब, डॉ. अहमद दाऊद, डॉ. मोहम्मद अयुब, अब्दुल्ला उबैद, मोहम्मद अली आणि अब्दुल गफ्फार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...