आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदच्या कोठडीत 14 दिवसांची झाली वाढ, दहशतवाद फंडिंगप्रकरणी झाली आहे अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकिस्तानमधील गुजरानवाला येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा (जेयूडी) म्होरक्या हाफिज सईदच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी 14 दिवसांची वाढ केली.

 
दहशतवाद फंडिंगप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन घेण्यासाठी हाफिज सईदला 17 जुलैला लाहोर येथून गुजरानवाला येथे जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्याला एटीसीसमोर हजर करण्यात आले होते. एटीसीने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी सईदला पुन्हा एटीसीसमोर हजर करण्यात आले असता त्याच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली. सईदविरोधातील पूर्ण आरोपपत्र 7 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असा आदेश न्यायालयाने पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाला (सीटीडी) दिला. पंजाब प्रांतातील विविध शहरांत दहशतवाद फंडिंग केल्याच्या आरोपावरून सीटीडीने 3 जुलैला सईदसह जेयूडीच्या 13 नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 

बातम्या आणखी आहेत...