Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | hair fall symptoms and home remedies

या कारणांमुळे गळतात केस, हे आहेत गळती थांबवण्याचे पाच सोपे घरगुती उपाय

हेल्थ डेस्क | Update - Aug 27, 2018, 12:04 AM IST

केस गळती ही एक सामान्य समस्या आहे. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आजार, जेनेटिक कारणांचा समावेश आहे.

 • hair fall symptoms and home remedies

  केस गळती ही एक सामान्य समस्या आहे. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आजार, जेनेटिक कारणांचा समावेश आहे. केस गळण्याच्या पाच कारणांविषयी आणि यापासून बचाव करण्याच्या सोप्या उपायांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


  यामुळे तर गळत नाही तुमचे केस?
  अॅनिमिया : रक्तामध्ये आयर्न कमी असल्याचा परिणाम केसांवर होतो. यामुळे केस गळतात. (सोर्स : जर्नल ऑफ द अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मटोलॉजी)


  थायरॉइड प्रॉब्लेम : थायरॉइड प्रॉब्लेममुळे बॉडीमधील हार्मोन डिस्टर्ब होतात आणि केस गळू शकतात. (सोर्स : ब्रिटिश थायरॉइड फाउंडेशन)


  चुकीचा आहार : आहारामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीनच्या कमतरतेने केस कमजोर होऊन गळतात. (यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधन)


  जास्त आैषधे घेणे : जास्त आैषधे घेणे किंवा कीमोथेरपीसारख्या उपचारांमुळे केसांची मुळे कमजोर होतात. (सोर्स : अमेरिकन हेअर लॉस असोसिएशन)


  मानसिक ताण : तणावामुळे केसांच्या मुळांमध्ये कमजोरी येते. यामुळे केस गळतात. (जर्मनीचे हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीचे संशोधन)


  केस गळती कशी थांबवावी?
  1. योगा आणि मेडिटेशन

  योगा, प्राणायाम, व्यायामाच्या माध्यमातून रक्ताभिसरण क्रिया सुधारता येते. ताण आणि तणाव कमी होतो. त्यामुळे केस गळत नाहीत.


  2. चांगली जीवनशैली
  दारू, सिगारेट, उशिरापर्यंत जागणे, तणावासारख्या गोष्टी टाळा. यामुळे शरीर सशक्त राहते. केस गळती कमी होते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • hair fall symptoms and home remedies

  3. चांगला आहार 
  जंक फूड, तेलकट, तुपकट पदार्थ टाळा. त्याऐवजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, अंडी, दूध यांसारखे पदार्थ खा. केसांची वाढ चांगली होते. 

 • hair fall symptoms and home remedies

  4. उष्णतेपासून बचाव 
  जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे, हेइर ड्रायरचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमजोर होऊ शकतात. हे टाळावे. 


  5. सौंदर्य प्रसाधने : केमिकल असलेला शाम्पू आणि कलर्सऐवजी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करा. यामुळे केस कमजोर होत नाहीत. 

Trending