आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना : पाच फलंदाजांची अर्धशतके; भारताने काढल्या 358 धावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - अागामी कसाेटी मालिकेसाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाचे पाच फलंदाज सराव सामन्यात चमकले. भारताच्या पृथ्वी शाॅ (६६), चेतेश्वर पुजारा (५४), कर्णधार विराट काेहली (६४), अजिंक्य रहाणे (५६) अाणि हनुमा विहारीने (५३) यजमान क्रिकेट अाॅस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताल पहिल्या डावात ३५८ धावा काढता अाल्या. दरम्यान यजमानांचा १९ वर्षीय वेगवान गाेलंदाज अॅराेन हार्डीने चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात धारदार गाेलंदाजी करतान चार विकेट घेतल्या.  

 
प्रत्युत्तरात क्रिकेट अाॅस्ट्रेलिया इलेव्हन संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद २४ धावा काढल्या. टीमचा सलामीवीर डी अार्सी शाॅर्ट (१०) अाणि ब्रायंट (१४) हे दाेघे मैदानावर कायम अाहेे. त्यांनी ४ षटकांत अभेद्य २४ धावांची भागीदारी रचली.

 
पावसाच्या व्यत्ययामुळे सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ हाेऊ शकला नाही. अाता दुसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने तुफानी खेळी केली.  येत्या ६ डिसेंबरपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत अाहे.   


राहुल पुन्हा फ्लाॅप :    टीम इंडियाला चांगली सुरुवात करता अाली नाही. टीमचा समीवीर लाेकेश राहुल (३) स्वस्तात बाद झाला. त्याला जॅकसन काेलमॅनने ब्रायंटकरवी झेलबाद केले. त्यामुळे ताे पुन्हा एकदा  अपयशी ठरला.  अाता सामन्यात त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही.

बातम्या आणखी आहेत...